BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ मार्च, २०२२

आधी केला खून, मग लटकवले फासावर आणि --

 



मंगळवेढा : शिवणगी येथे राहणाऱ्या तरुण शिक्षकाचा आधी खून करण्यात आला आणि नंतर फासावर लटकविण्यात आले तरीही पत्नीने कानावर हात ठेवत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले.  (husband's murder by wife )


सत्यवान कांबळे या तरुण शिक्षकाची गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्यावर मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली होती. शिक्षकाची पत्नी करीत असलेला आक्रोश ऐकून अनेकांच्या हृदयाला पीळ पडत होता पण या घटनेतील सत्य बाहेर आले तेंव्हा मंगळवेढा तालुका हादरून गेला. प्रियकराची मदत घेवून पत्नीनेच आपल्या पतीचा काटा काढल्याची बाब अत्यंत वेगाने समोर आली. संशयास्पद वाटल्याने सांगली पोलिसांनी सहज हटकले तेंव्हा सांगली पोलिसांना या कारस्थानातील आरोपी मिळाले आणि सगळेच बिंग फुटले.  अनैतिक संबंधात (Immoral relationship) अडसर ठरत असल्याने पत्नीनेच आपल्या पतीचा काटा काढण्याचे कुभांड आरोपीकडून पोलिसांना समजले आणि भासवू पहात असलेल्या आत्महत्येप्रकरणी बराच उलघडा झाला.


सांगली पोलिसांच्या हाती आरोपी लागताच त्यांनी  मंगळवेढा पोलिसांच्या हवाली केले आणि एका खून प्रकरणाचे रहस्य खुले झाले. मयत सत्यवान कांबळे यांनी आत्महत्या केल्याचे समजताच  नातेवाईक तातडीने शिवणगी येथे पोहोचले तेंव्हा त्यांना धक्काही बसला आणि ही आत्महत्या नसल्याचे अनेक पुरावे त्यांच्याशी बोलू लागले. छताच्या लोखंडी हुकास लटकत असलेला मृतदेह त्यांना दिसलाच पण नातेवाईकांनी निरीक्षण करून पाहिले असता त्यांना अन्य काही बाबी दिसून आल्या आणि नातेवाईकांना दुसरा धक्का बसला.  मयताची पत्नी सारिका ही आक्रोश करीत होती, परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत होते. पत्नीचा आकांत उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवत होता. 


अचानक आत्महत्या कशासाठी केली असेल ? हा प्रश्न नातेवाईकांना पडला होता, त्यांनी मृतदेह निरखून आणि बारकाईने पहिला असता त्यांना दुसरा धक्का बसला. मयत सत्यवान कांबळे यांच्या नाकातून रक्त आलेले त्यांना दिसले त्यामुळे त्यांनी आणखी बारकाईने पाहिले. सत्यवान कांबळे यांच्या चेहऱ्यावर मारहाणीचे व्रण दिसत होते, ओठाच्या खालच्या बाजूस, हनुवटीवर आणि उजव्या पायाच्या गुडग्यावर जखमाही दिसत होत्या. फरशीवर देखील रक्त दिसत होते. गळफास दिलेल्या दोरीला देखील रक्त लागलेले होते. हे सगळे चित्र पाहून ही आत्महत्या नसून काही वेगळे असल्याची जाणीव मयताचे वडील आणि नातेवाईक यांना  झाली. 


गळफास लावून आत्महत्या केलेल्या मृतदेहाच्या अंगावर खुणा, रक्त हे पुरावे घटनेबद्धल बरेच काही बोलून जात होते. रडारड करणाऱ्या सत्यवान कांबळे यांच्या पत्नीकडे नातेवाईकांनी विचारणा केली असता तिने सरळ कानावर हात ठेवत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. नातेवाईक आणि मृताचे वडील मच्छिंद्र कांबळे यांना मात्र काय घडले असावे याचा अंदाज येऊ लागला. घरात एवढी मोठी घटना घडते, फरशीवर रक्त सांडते आणि अंगावर जखमा दिसतात. मयताला आधी मारहाण झाली असल्याचे सांगणारे हे सगळे पुरावे होते. तिकडे सांगलीत आरोपींनी देखील सगळी माहिती दिल्यामुळे एकूण प्रकरणाचे धागेदोरे उलगडले. (Mangalawedha crime )


सत्यवान कांबळे यांचे वडील मच्छिंद्र कांबळे यांनी याबाबत मंगळवेढा पोलिसात फिर्याद दिली आणि पोलिसांनी अनैतिक संबंधातून झालेल्या या खुनाचा गुन्हा दाखल केला. मयताची पत्नी इंदिरा सत्यवान कांबळे हिच्यासह कुपवाड, सांगली येथील ३२ वर्षे वयाच्या प्रशांत अशोक पवार, २४ वर्षे वयाचे साथीदार  अजय परशुराम घाडगे (रा, समडोळी) शाहरुख रफिक शेख (कुपवाड) या चौघांना अटक केली आणि न्यायालयासमोर उभे केले असता चारही आरोपींना न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Husband's murder through immoral relationship)     


सत्यवान कांबळे यांच्या पत्नीचे सांगलीच्या प्रशांत अशोक पवार याच्याशी अनैतिक संबध होते. या प्रकरणात पती सत्यवान यांचा अडथळा येत असल्याचा राग पत्नीच्या मनात होता त्यामुळे तिने आपल्याच तरुण पतीचा काटा काढण्याचे कारस्थान रचले आणि शाहरुख रफिक शेख आणि अजय परशुराम घाडगे  यांनी सत्यवान याचा घरी झोपलेले असताना हा खून केला.  सत्यवान यांचा खून करून कुणाला शंका येऊ नये यासाठी मृतदेह पंख्याला टांगण्यात आला.  सत्यवान कांबळे यांनी आत्महत्या केल्याचा आभास (Pretend to commit suicide) निर्माण केला गेला होता. हा एकूण गुन्हा कशा प्रकारे केला ? प्राण गेल्यावर फासावर लटकावले की अर्धवट मारहाण करून टांगले गेले अशा अनेक प्रश्नाची उत्तरे पोलिसांच्या तपासात अधिक ठळकपणे समोर येणार आहेत.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !