पंढरपूर : दोन एकराच्या शेततळ्यातील हजारो मासे चोरीला गेल्याची तक्रार पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ (Pandharpur Crime) येथील दीपक भोरकडे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
पंढरपूर शहर आणि तालुक्यात चोरीच्या घटना सतत घडत आहेत. घरात कुणी नसले की घरफोडी आणि दागिने बाहेर घेवून गेले तरी काही बतावणी करून फसवणूक आणि लुट असे प्रकार घडताना अनेकदा दिसते. अलीकडे तर बँका देखील सुरक्षित राहिल्या नसल्याचे दिसून येत आहे. दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचतात पण आता हजारो मासे चोरीला गेल्याची देखील तक्रार पोलिसाकडे करण्यात आली आहे. (Theft of thousands of fish from farm ponds) या घटनेने चोरीचा नवाच प्रकार समोर आला आहे
दोन एकर क्षेत्रातील शेततळ्यातील एक लाख रुपये किमतीचे एक टन वजनाचे हजारो मासे चोरीला गेले असल्याची ही तक्रार आहे. तपकिरी शेटफळ येथे दीपक भोरकडे यांच्या शेतात असेलल्या शेततळ्यात मत्स्य व्यवसाय देखील करण्यात येतो. मोहन विठ्ठल सरगर हे येथे देखरेखीचे काम करतात. शेततळ्यात सोमनाथ भोरकडे आणि मोहन सरगर यांनी चीलापी जातीचे ५५ हजार मत्स्य बीज सोडले होते. माशांना खाद्य टाकणे, तळ्यातील पाण्याची पातळी पाहणे अशा प्रकारची कामे मोहन सरगर करीत असतो.
मागील वर्षी ऑगष्ट महिन्यात मत्स्यबीज सोडण्यात आलेले असल्याने तळ्यातील मासे मोठे होऊ लागले होते. मत्स्य व्यवसायातील तज्ञ म्हणून पंढरपूर तालुक्यातील देवडे (करकंब) येथील समाधान मोहन भोई हा अधूनमधून येवून माशांची पाहणी करीत होता. माशांच्या आहाराबाबत आणि औषधाबाबत तो सल्लाही देत होता. माशांची वाढ होत असतानाच फेब्रुवारीपासून तळ्यातील मासे कमी कमी होत असल्याचे भोरकडे यांना जाणवले. तळ्यातील माशांची कुणीतरी चोरी केली आहे हे त्यांच्या लक्षात आले.
एक लाख रुपये किमतीचे चीलापी जातीचे एक टन मासे चोरीला गेले असल्याची तक्रार त्यांनी पंढरपूर तालुका पोलिसांकडे केली आहे. सोन्या नाण्याची आणि रोख रकमेची चोरी अनेकदा होते पण शेततळ्यातील हजारो माशांची चोरी ( Fish theft) झाल्याने हा चर्चेचा विषय तर बनलाच आहे पण तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणत माशांची कुणी आणि कशी चोरी केली असेल हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या प्रश्नांचे उत्तर मिळणार आहे. तळ्यातील मासे चोरी जाण्याची ही मात्र दुर्मिळ घटना आहे.
हे देखील वाचा :>>


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !