BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ मार्च, २०२२

क्रिकेटर रोहित शर्माने तोडले चाहत्याचेच नाक !

 



बंगळूर : क्रिकेटचे चाहते खेळासह आपल्या आवडत्या खेळाडूवर देखील मनापासून प्रेम करतात पण भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा याने आपल्याच चाहत्याने नाक तोडले आहे. Rohit Sharma's sixes break fans' nose )


क्रिकेट हा खेळ प्रचंड लोकप्रिय असून या खेळाचे चाहते जगभर आहेत. क्रिकेटचे चाहते आपले काम सोडून खर्च करून क्रिकेट स्टेडीयममध्ये बसून क्रिकेट पाहतात तर उर्वरित क्रिकेटप्रेमी घरात बसून टीव्हीवर लक्षपूर्वक क्रिकेट सामने पाहतात आणि खेळाचा मनमुराद आनंद लुटतात. क्रिकेट शौकीन पदरमोड करून परदेशी जावूनही सामने पाहत असतात. क्रिकेट खेळाडूवर चाहते उदंड प्रेम करताना दिसतात पण स्टेडीयममध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेत असलेल्या एका क्रिकेटप्रेमीला हा आनंद भलताच महागात पडला. रोहित शर्मा यांनी मारलेला सिक्सर या चाहत्याच्या नाकावर जाऊन आदळला आणि चाहत्याचे नाक तुटले. 


बंगळूर येथील चिन्नास्वामी स्टेडीयमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरी कसोटी सुरु आहे. दिवसरात्र खेळला जाणारा हा सामना तसा रंगत वाढवत निघाला आहे पण एका चाहत्याच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र पूर्णपणे बदलून गेला आहे. कर्णधार असलेल्या रोहित शर्मा याने २५ चेंडूत केवळ १५ धावा केल्या. मैदानात अपयशी ठरलेल्या या खेळाडूने एक बॉल असा काही मारला की तो सिक्सर झाला. एकीकडे त्याच्या सिक्सरचा आनंद मैदानात सुरु असताना मैदानातील एक चाहता मात्र खूप कळवळला. रोहित शर्मा याने मारलेला एक उत्तुंग षटकार कॉर्पोरेट बॉक्समध्ये बसलेल्या एका बावीस वर्षीय चाहत्याच्या दिशेने गेला आणि तो थेट त्याच्या नाकावर आदळला. 


वेगात आलेला चेंडू नाकावर आदळताच हा चाहता जखमी झाला. त्याच्या नाकातून रक्त येवू लागले. तातडीने त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात एक्स रे काढला असता त्याच्या नाकाचे हाड तुटले असल्याचे समोर आले. क्रिकेट मैदानात अनेक खेळाडूंना दुखापत झाली आहे, चेंडूचे मार लागले असून दुर्घटनाही घडल्या आहेत. मैदानाबाहेर बसून क्रिकेटचा आनंद घेताना अशा घटना सहसा घडत नाहीत पण रोहित शर्मा याच्या सिक्सरने मात्र क्रिकेट चाहत्यांचे नाक तोडले आहे.      

हे देखील वाचा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !