BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ मार्च, २०२२

पंढरपूर : 'त्या' भामट्या पोलिसाला अखेर कर्नाटकातूनअटक !

 


पंढरपूर : पोलीस असल्याचे सांगत भर रस्त्यावर एका भामट्याने हातचलाखी करीत महिलेचे दोन लाखांचे दागिने लुटणाऱ्या भामट्यास आणि दुसऱ्या एका मोठ्या घरफोडीतील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पंढरपूर पोलिसांना यश आले आहे. (Two accused of theft arrested with jewelery )


लुटमार आणि फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात याचा नेहमीच अनुभव येतो तरीही लोक फसतात आणि लबाड भामट्यांचे फावते. आपण पोलीस असून आपले दागिने काढून जवळच्या पिशवीत अथवा पर्समध्ये ठेवा अशा बतावण्या करून फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. (Fake police) पंढरीतही यापूर्वी असे प्रकार घडले आहेत. पोलीस असल्याची बतावणी करून अशा प्रकारे फसवणूक केली जाते याची आता सर्वांनाच माहिती आहे तरी देखील पंढरीत अशी घटना घडली होती ( Pandharapur Crime ) आणि एका महिलेचे १ लाख ८७ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास करण्यात आले होते. 


शहा यांच्या चोरीप्रकरणी पंढरपूर पोलिसांनी या गुन्ह्याचा अत्यंत कौशल्याने तपास करीत कर्नाटकातून बिदर येथून नवाबअली मन्सूर अली याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याच्याकडून पाच तोळे सोन्याच्या पाटल्या हस्तगत करण्यात यश मिळविले. पंढरपूर शहरात जुना आणि नवा कराड नाका दरम्यान असलेल्या दत्त नगर भागातील एका चोरीने देखील पंढरपूर हादरले होते परंतु या चोरीचाही छडा लावण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. चोरीच्या या दोन्ही घटनेत आरोपी पकडले असून त्यांच्याकडून १३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांचे हे फार मोठे यश मानले जात आहे. 


दत्तनगर परिसरात राहणाऱ्या सरिता मिलिंद कांबळे यांच्या दुसऱ्या मजल्यावरील घरातून २६ फेब्रुवारी रोजी ३ लाख ९५ हजार रुपयांचे आठ तोळे सोन्याचे दागिने चोरी गेले होते. या घटनेने चोरट्याबाबत दहशत निर्माण झाली होती परंतु पोलिसांनी या गुन्ह्याचा अत्यंत कौशल्याने तपास केला आणि जवळच राहणाऱ्या अजिंक्य अनिल कांबळे या २० वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे बारकाईने आणि खास 'पोलिसी' पद्धतीने तपास केल्यानंतर अजिंक्य कांबळे याने हा गुन्हा केल्याची कबुली तर दिलीच पण चोरलेले दागिनेही त्याने पोलिसांच्या स्वाधीन केले. या दोनही घटना मोठ्या होत्या आणि पोलीसासाठी आव्हानात्मक देखील होत्या पण छडा लावण्यात यश आले आणि पोलिसांच्या बाबतीत नागरिकात देखील विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. (Success of Pandharpur Police)   


पोलीस असल्याची बतावणी !

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या जवळून जुन्या अकलूज रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ३१ जानेवारी २२ रोजी हा प्रकार घडला होता. डोंबे गल्लीत राहणारे डॉ. सारंग शहा आणि त्यांच्या पत्नी सीमा शहा हे दोघे आपल्या दुचाकीवरून नातेवाईकांच्याकडे निघाले असताना गांधी बंगल्याजवळ आले असता मागून एक दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आला. त्याने आपण पोलीस असल्याची बतावणी करीत विश्वासात घेतले. 'शहरात चोऱ्या वाढलेल्या आहेत. दागिने घालून असे फिरू नका, असा साहेबांचा आदेश आहे' असे तो सांगू लागला. अंगावरचे दागिने काढून पर्समध्ये ठेवण्याचा सल्लाही त्याने दिला. त्याप्रमाणे सीमा शहा यांनी आपल्या अंगावरील दागिने काढले आणि आपल्या पर्समध्ये ठेवले होते. 


हातचलाखी केली !

व्वा लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याच्या पाटल्या आणि अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र असे १ लाख ८७ हजार रुपये किमतीचे दागिने त्यांनी पर्समध्ये काढून ठेवले. पर्समध्ये खरोखरच दागिने व्यवस्थित ठेवले असल्याची खात्री करून घेण्याचे नाटक करीत या भामट्याने पर्स आपल्या हातात घेतली. दागिने एका पेपरमध्ये गुंडाळून ही पर्स पुन्हा शहा यांच्या हातात दिली. पर्स घेवून शहा आपल्या नातेवाईकांकडे निघून गेले. तेथे गेल्यानंतर त्यांनी पर्स उघडून पुन्हा एकदा खात्री करून घेतली असता त्यांना धक्का बसला आणि भामट्याने हातचलाखी करून आपली फसवणूक केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.  पर्समध्ये सोन्याच्या दागीण्याऐवजी स्टीलचे दोन कडे आणि छोटे दगड त्यांना दिसून आले. या प्रकाराने त्या गोंधळून गेल्या. 


'तो' तर भामटा !

पोलीस असल्याचे सांगणारा पोलीस नसून भामटा होता आणि त्याने हातचलाखी करून आपल्याला लुटले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दागिने ठेवल्याची खात्री करीत त्याने पेपरमध्ये दागिने गुंडाळून देण्याचे नाटक करीत हातचलाखी केली असल्याचे लक्षात आले होते पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. हा प्रकार लक्षात येताच शहा यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे गाठले आणि आपली फसवणूक करून लुट झाल्याची तक्रार पंढरपूर शहर पोलिसात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला होता.   


हे देखील वाचा : 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !