BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ मार्च, २०२२

न्यायालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल !

 




पंढरपूर : मंगळवेढा पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप करीत न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर स्वत:ला पेटवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीच्या विरुध्द पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.self-immolation)


पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाची तक्रार घेतली पाहिजे असा दंडक असून महिलांना तर अधिक प्राधान्य दिले जावे अशी अपेक्षा आहे परंतु आपल्याला मंगळवेढा पोलिसांनी बेदखल केले असल्याचा आरोपी करीत एका महिलेने पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या ( Pandharapur Court ) प्रवेशद्वारात अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता न्याय मागत असेलेल्या या तरुणीच्या विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवेढा पोलीस ठाण्यात जावूनही आपली तक्रार पोलिसांनी घेतली नाही म्हणून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे या तरुणीने सांगितले आहे. 


आत्मदहन करू पाहणाऱ्या तरुणीच्या विरोधात पोलीस कर्मचारी अजित मिसाळ यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर टपाल बॉक्सजवळ एक तरुणी आपल्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिसाळ यांना मिळाली. यावेळी ते धावत तिकडे गेले असता एक तरुणी अंगावर पेट्रोल ओतून एक तरुणी काडी ओढून पेटवून घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसले. पोलिसांनी तातडीने तिच्या हातातील काडीपेटी ओढून घेतली आणि पुढील अनर्थ टळला. 


आपण मंगळवेढा पोलीस ठाण्यात एका तरूणाच्या विरोधात नोव्हेंबर २०२१ मध्ये तक्रार दिली होती आणि त्यानुसार सदर तरुणास अटक देखील झाली होती. अटकेनंतर त्याला जामीन मिळाला असून तो तरुण सद्या जामिनावर बाहेर आहे. ८ मार्च रोजी त्याने त्याच्या घरी बोलावून घेतले आणि शिवीगाळ, मारहाण केली. या घटनेची तक्रार देण्यासाठी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी आपली तक्रार घेतली नाही म्हणून आत्महत्या करण्याचा पर्यंत केला असल्याचे या तरुणीने सांगितले आहे. सदर तरुणीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पंढरपूर शहर पोलिसात दाखल करण्यात आला आहे. Attempted self-immolation by accusing the police)      



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !