मोडनिंब : सोलापूर - पुणे महामार्गावर उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला अचानक आग ( Eicher Tempo caught fire) लागल्याने परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पाण्याचे फवारे मारून आग विझविण्यात आली परंतु टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसात रस्त्यावरील प्रवाशी वाहने जळण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. चाळीस प्रवासी घेवून निघालेल्या शिवशाही बसला देखील अचानक आग लागली परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही. चालकाने प्रसंगावधान राखले त्यामुळे अनुचित काही घडले नाही पण बस पूर्ण जळून खाक झाली. या घटनेनंतर धावत्या कारला आग लागण्याच्या घटना समोर आल्या आणि आज उभ्या आयशर टेंपोला मोडनिंब येथे आग लागल्याची घटना घडली. (Eicher tempo caught fire at Modanimb) या घटनेने अनेकांची तारांबळ उडाली.
मोडनिंब येथील राऊत पेट्रोल पंपाच्या जवळ रस्त्याच्या बाजूला एक आयशर टेंपो उभा होता. अचानक या आयशर टेंपोला आग लागली असल्याचे दिसून आले. उभ्या टेंपोचा टायर पेटला आणि ही आग चांगलीच भडकताना दिसून आली. पुढचा टायर जाळू लागल्याने आग आणि दूरचे लोट उसळू लागले त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. परिसरातील नागरिकांची देखील तारांबळ उडाली. आग कशामुळे लागली असावी याचा काहीच अंदाज येत नव्हता पण उन्हामुळे अथवा काही घर्षणामुळे गरम होवून आग लागली असावी असा अंदाज बांधण्यात येत होता.
डाव्या बाजूचा टायर पेटल्याने धुराचे प्रमाण अधिक होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. रस्त्याच्या बाजूलाच हा टेंपो असल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पाईपद्वारे पाणी मारून ही आग आटोक्यात आणण्यात आली आणि सोलापूर - पुणे महामार्गावरील (Solapur Pune National highway) थांबलेली वाहतूक देखील पूर्ववत सुरु झाली. राऊत पेट्रोल पंपाच्या समोरच ही घटना घडली आहे.
हे देखील वाचा :>>
- पट्ठ्याने पेटविले आपलेच घर !
- पंढरपूर तालुक्यात हेराफेरी, वनक्षेत्रपाल निलंबित !
- घरगुती वापराचा गॅस देखील महागला !
- डाव फसला, लहान भावाच्या जागी मोठा भाऊ परीक्षेला बसला आणि --
- पंढरपूर तालुक्यात गरीब विक्रेत्यालाही लुटले !
- मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मेहुण्याची मालमत्ता ईडी कडून जप्त !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !