मुंबई : पंढरपूर तालुक्यातील १६ गावात वृक्षलागवड योजनेत हेराफेरी करून शासनाची फसवणूक करणाऱ्या वन क्षेत्रपालास निलंबित केल्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालूक्यातील वृक्ष लागवड योजना राबवताना २०१७ ते २०१९ या कालखंडात ३० हजार वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या योजनेत वन क्षेत्रपालाने कोट्यावधी रुपयांची अफरातफर केली होती शिवाय त्याने अपंग व्यक्तींच्या नावाने देखील धनादेश काढले असल्याचा आरोप विधान परिषद सदस्य किशोर दराडे यांनी केला आणि पुरावे देखील सादर केले. (Allegations of corruption )आमदार दराडे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना सदर अधिकाऱ्यास निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
सदर प्रकरणाची एसआयटीच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील आ. दराडे यांनी केली आणि शिवसेनेच्या सदस्या मनीषा कायंदे यांनी देखील या मागणीला पाठींबा व्यक्त केला आहे. ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेवरच कायंदे यांनी आक्षेप घेतला आणि एका जिल्ह्यात असा प्रकार असेल तर राज्यात काय स्थिती असेल असा सवाल केला. वृक्ष लागवड योजनेची एसआयटी चौकशी करण्याची मागणी कायंदे यांनी लावून धरली. यावेळी पंढरपूर तालुक्यातील वनक्षेत्रपाल (Forest ranger) यास तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याची घोषण राज्यमंत्री भरणे यांनी केली. राज्यभरातील ३३ हजार कोटी वृक्ष लागवड योजनेसाठी नेमलेल्या समितीच्या दोन बैठका झाल्या असून लवकरच ही समिती याबाबत अहवाल सादर करणार आहे. अहवालानुसार दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही भरणे यांनी यावेळी दिली.
किशोर अहिरे निलंबित !
पंढरपूर तालुक्यातील १६ गावातील वृक्ष लागवड योजनेत वन क्षेत्रपाल आणि कायम वन मजूर यांच्याकडून मोठा भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण मोठ्या चर्चेत होते. वन विभागात कायमस्वरूपी नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आले होते. फोन पे आणि गुगल पे च्या माध्यमातून चाळीस चाळीस हजार रुपये घेतले असल्याचे पुरावे देखील देण्यात आलेले आहेत. या प्रकरणी समिती नेमण्यात आली होती. गंभीर स्वरूपाचे आरोप लक्षात घेवून पंढरपूर तालुक्यातील तत्कालीन वन क्षेत्रपाल (Pandharpur forest ranger suspended) किशोर अहिरे यांना निलंबित करण्यात आले आहे.
वृक्ष लागवडीचा फज्जा !
भाजप सरकारच्या काळात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याची योजना आखण्यात आली पण या योजनेचा पुरता फज्जा उडालेला आहे. झाडे लावण्याचे आदेश देण्यात आले आणि आदेशाप्रमाणे सरकारी बाबूंनी झाडे लावलीही पण पुढे त्याची कसलीही निगा आणि काळजी घेण्याचे नियोजन नसल्याने काही महिन्यात ही झाडे जळून गेली. या झाडांना पाणी देण्याचे कसलेही नियोजन करण्यात आले नाही. मागील वर्षांची झाडे जळून गेली तरी पुढच्या वर्षी पुन्हा झाडे लावण्याचा प्रकार करण्यात आला. झाडे लावायची आणि ती जळून जायची असाच प्रकार चालत राहिला. योगायोगाने काही झाडे टिकली पण बाकीची झाडे त्याच वर्षी नष्ट देखील झाली आहेत. त्यामुळे योजनेचा तर फज्जा उडालाच पण शासनाचा मोठा खर्च देखील पाण्यात गेला आहे.
हे देखील वाचा :>>
- पट्ठ्याने पेटविले आपलेच घर !
- पंढरपूर तालुक्यात हेराफेरी, वनक्षेत्रपाल निलंबित !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लीक करा > शोध न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !