सोलापूर : बारावीच्या परीक्षेत लहान भावाच्या जागी मोठा भाऊ परीक्षेला गेला पण डाव फसल्याने दोन्ही बंधूंच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा ( Fraud in 12th exam) दाखल झाला.
अलीकडे दहावी आणि बारावी परीक्षेचे पेपर फुटण्याचे पराक्र सतत चर्चेला येत असतात तसेच अभ्यास न करता कॉपी करून पास होण्याकडेही अनेक विद्यार्थ्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येते. कॉपी करताना अनेक विद्यार्थी पकडले जातात आणि त्यांच्यावर कारवाई देखील होते. सगळ्याच यंत्रणा आता कडक झालेल्या असतानाही काही विद्यार्थी चुकीचे धाडस करतात आणि स्वत:ची मोठी फसगत करून घेतात. असे अनेक प्रकार उघडकीस आले असले तरी काही विद्यार्थी या फंदात पडून फसतात. ( Cheating to pune board by solapur sudent) असाच प्रकार सोलापूर येथील एका परीक्षा केंद्रावर उघडकीस आला आणि 'तेलही गेले, तूपही गेले' अशा अनुभव पवार बंधूना घ्यावा लागला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळळी येथील चैतन्य अंगद पवार हा बारावी इयत्तेत शिकत होता. बारावीच्या परीक्षेसाठी सोलापूरच्या दयानंद आर्ट्स अँड सायन्स कॉलेजवर त्याचा बैठक क्रमांक आलेला होता. अर्थशास्त्र विषयाचा पेपर सुरु असताना पर्यवेक्षक असताना खोली क्रमांक १०६ मध्ये तपासणीसाठी गेल्यावर एका परीक्षार्थीच्या हॉल तिकिटावरील फोटो संशयास्पद वाटला. त्यामुळे त्याची अधिक तपासणी केली असता सदर रोल क्रमांकावर चैतन्य अंगद पवार याने परीक्षा देण्याऐवजी त्याचा मोठा भाऊ योगेश अंगद पवार हा परीक्षा देत असल्याचे उघडकीस आले. (exam given in the name of littile brother) पर्यवेक्षकांना संशय आल्याने हे सगळे बिंग फुटले आणि दोन भावांचा डाव फसला गेला.
केवळ बारावीच्या या एक पेपरपुरता हा विषय नसून यापूर्वी योगेश पवार याने बोर्डाची तोंडी परीक्षा आणि इंग्रजी विषयाचा पेपर देखील चैतन्य याच्याच नावावर तोतया विद्यार्थी म्हणून दिला असल्याची बाब उघडकीस आली. लहान भाऊ चैतन्य याचे हॉल तिकीट घेऊन परीक्षा हजेरी पत्रकारावर देखील अंगद याने चैतन्य पवार याची बनावट सही देखील केली. ही घटना उघडकीस आल्याने दोन्ही भाऊ आपणच विणलेल्या जाळ्यात फसले गेले. बारावी पुणे बोर्डाची फसवणूक केली म्हणून दयानंद महाविद्यालयाचे उप प्राचार्य अरुण खांडेकर यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चैतन्य अंगद पवार (वय १८) आणि मोठा भाऊ योगेश अंगद पवार (वय २२) या दोघांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. (The exam was given by the elder brother in the name of the younger brother) या घटनेने मोठी खळबळ उडाली असून परीक्षेच्या काळात देखील विद्यार्थ्यांची या विषयाचीच चर्चा रंगू लागली आहे.
हे देखील वाचा :>>
- पट्ठ्याने पेटविले आपलेच घर !
- पंढरपूर तालुक्यात हेराफेरी, वनक्षेत्रपाल निलंबित !
- घरगुती वापराचा गॅस देखील महागला !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लीक करा > शोध न्यूज


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !