BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ मार्च, २०२२

पेट्रोलसह घरगुती वापराचा गॅस देखील महागला !

 


नवी दिल्ली : पाच राज्यातील निवडणुका संपल्या की पेट्रोल, गॅस दरांचा भडका  उडाला असून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दारात तब्बल पन्नास रुपयांची वाढ ( LPG Gas Petrol price hike) झाली आहे. 


अजूनही अच्छे दिन येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना पुन्हा एकदा मोठा दणका देण्यात आला असून आजपासून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत पन्नास रुपयांनी वाढविण्यात आली आहे.  पेट्रोल- डिझेलचे दर देखील लिटरमागे ८५ पैशांची वाढविण्यात आले आहेत. घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या घरगुती वापराच्या (Domastic cooking gas price) गॅस सिलिंडरसाठी आता ९४९.५० रुपये  मोजावे लागणार आहेत.  या आधी ६ ऑक्टोबर रोजी हे दर वाढविण्यात आले होते त्यानंतर आता पुन्हा हे दर एकदम ५० रुपयांनी वाढवले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २ हजार ३ रुपये ५० पैसे एवढी झाली असून त्याचा बोजाही ग्राहकांवरच पडत आहे.  


पेट्रोल दरवाढ !

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांनी वाढ केली असतानाच पेट्रोल डिझेलच्या दरात ८५ पैशानी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आता ११० रुपयांपेक्षाही पुढे गळे असून डिझेल ९५ रुपयांच्या पुढे पोहोचले आहे त्यामुळे स्वयपांक घरात गृहिणी आणि पेट्रोल पंपावर नागरिक हैराण झालेले आहेत. मधल्या काळात देशात पाच राज्यात निवडणूक होती त्यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवले गेले होते. निवडणूक संपल्यानंतर गॅस आणि इंधनाचे दर वाढणार याचा सर्वानाच अंदाज आलेला होता. त्यानुसार ही दरवाढ सुरु असून सामान्यांचे जगणे अवघड होत आहे.


महागाई वाढणार !

गॅस आणि इंधन दराच्या वाढीपुरते हे संकट थांबणार नसून माल वाहतूकदार देखील आता दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. इंधन दर वाढले की मालाची वाहतूक करण्याचे दर वाढतात आणि त्याचा परिणाम थेट प्रत्येक वस्तूंच्या महागाईवर होत असतो. एकंदर ही सगळी झळ सामान्य माणसांच्या खिशापर्यंत जात असते. बाजारातील महागाई देखील आता लवकरच वाढणार असल्याची चिन्हे आहेत. भाजीपाला, अन्नधान्य, रिक्षा भाडे, लांब पल्ल्याचा प्रवास या सगळ्या गोष्टीना या महागाईची झळ बसणार आहे ( increase in domestic gas, Petrol, Disel price) आणि सामान्य माणसांचा रिकामा झालेला खिसा देखील आता अधिक हलका होणार आहे.       


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !