BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ फेब्रु, २०२२

भाजपचा बडा नेता तुरुंगाच्या वाटेवर ?

 



नागपूर : बेनामी मालमत्तेच्या आरोपावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ भाजपचे बडे नेते आणि माजी मंत्री गोत्यात येताना दिसत असून त्यांच्या बेनामी संपत्तीकडे त्यांच्याच नातेवाइकाने बोट दाखवले असल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित शंभर कोटींच्या वसुलीचा आणि बेनामी संपत्तीचा आरोप झाला. या आरोपामुळे त्यांना राजीनामा तर द्यावाच लागला पण सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक देखील केली. त्यांच्या या अटकेनंतर भारतीय जनता पक्षाच्या जवळपास सगळ्याच नेत्यांनी सरकारच्या विरोधात रान उठवले होते. महाविकास आघाडी सरकारला 'वसुली सरकार' असे देखील संबोधण्यात आले पण आता भाजपाच्या हे अंगलट येताना दिसत आहे. भाजपचे नेते आणि युती सरकारमधील उर्जामंत्री यांच्यावर भ्रष्टाचार आणि बेनामी संपतीचा मोठा आरोप लावण्यात आला असून हा आरोप कुठल्या राजकीय पक्षाने नव्हे तर थेट त्यांच्या जवळच्या नातेवाईकाने केला आहे त्यामुळे भाजपला हादरा बसने स्वाभाविक आहे. 


भाजपचे नेते आणि माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोट्यावधीची बेनामी संपत्ती जमा केली असून आपण स्वतःच त्याचे साक्षीदार आहोत असा आरोप त्यांच्याच पत्नीचे भाचे असलेल्या सुरज तातोडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तातोडे हे  बावनकुळे मंत्री असताना त्यांच्या नागपूर आणि मुंबईतील बंगल्यात काम करीत होते. बावनकुळे हे ठेकेदाराकडून मिळालेली भ्रष्टाचाराची रक्कम आपल्याकडेच देत होते, त्यांनी दोन वर्षांच्या काळात सुमारे शंभर कोटी रुपये काळा पैसा आपल्याकडेच ठेवायला दिला होता असा स्फोटक आणि प्रचंड खळबळ उडवून देणारा दावा या तातोडे यांनी जाहीरपणे केला आहे. ज्या कंपन्याकडून हा  पैसा घेण्यात आला त्यांची नावे देखील तातोडे यांनी जाहीर केली आहेत.      


याच काळ्या पैशाच्या हिशोबात घोटाळा केला असा आरोप करीत  तातोडे यांना बावनकुळे यांनी बाजूला केले. आपल्या नावावर नागपूर येथे पाच  फ्लॅट, चार कार, कंपनीतील शेअर्स असून ही सगळी संपत्ती बावनकुळे यांनीच बळजबरीने आपल्या नावावर केली आहे. सतत दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि तणावामुळे आपणास ब्रेन हॅमरेज झाला परंतु त्यातून बचावलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि खटला चालवला जात आहे त्याचप्रमाणे बावनकुळे यांच्या विरोधात साक्षीदारच आरोप करीत आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आली आहे. 


बावनकुळे यांच्यावर राजकीय नेत्यांनी आरोप केले नसून त्यांच्याच जवळच्या नातेवाईकाने आणि कथित प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीने केले आहेत त्यामुळे या प्रकरणाला वेगळे महत्व प्राप्त होत आहे.  यावर आता भाजप, विशेषतः दुसऱ्या पक्षातील नेत्यावर भ्रष्टाचाराचे रोज आरोप करणारे किरीट सोमय्या  काय बोलणार याकडेही  सर्वांचे लक्ष आहे. शिवाय या आरोपामुळे बावनकुळे यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.    


हे देखील वाचा :>> 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !