मुंबई : राजकारणाची गटारगंगा झाली असल्याचे मत सर्वसामान्य जनता व्यक्त करू लागली असताना अभिनेते सुबोध भावे यांनी जनतेच्या मनातील विचार आज बोलून दाखवले असून सद्याच्या राजकीय नेत्यांना 'नालायक' असे संबोधले आहे.
काही वर्षापर्यंत राजकारण हे पवित्र आणि निष्ठेचे वाटत होते, राजकीय नेत्यांचा सन्मान जनमानसात मनामनात होता आणि राजकीय नेते सन्मानाला शोभेल असे काम देखील करीत होते. निष्ठा, चारित्र्य, समर्पण असे भाव जपले जात होते आणि जनतेसाठी खऱ्याखुऱ्या भावनेने काम करीत होते. आजच्या राजकारणाची अवस्था पाहून कुणालाही किळस येऊ लागली असल्याचे लोक आता खुलेपणाने बोलू लागले आहेत. गुन्हेगारी, भ्रष्टाचार यांचा संबंध वाढला असल्याचे दिसू लागले आहे. प्रसार माध्यमांमुळे आता काहीच लपून राहिलेले नसून कोणता नेता कसा आहे याची परिपूर्ण माहिती सामान्य नागरिकाला देखील मिळत आहे. जनतेसाठी काही करीत असल्याचे दाखवणारे अनेक नेते केवळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत आरोप करीत सुटलेले आहेत आणि आरोपावर उत्तरे देण्यात वेळ घालवत आहेत.
सत्तेसाठी काहीही एवढेच राजकीय वर्तुळात दिसत असून कमी अधिक प्रमाणात सगळ्याच राजकीय पक्षात अशी मंडळी आहेत त्यामुळे राजकारण गढूळ होऊन गेले असून चांगल्या माणसाला आणि खरोखरच समाजासाठी काही करण्याची इच्छा असलेल्याना राजकरणात स्थान नाही असेच मत सामान्य जनतेचे झाले असल्याचे मत सतत व्यक्त होत आहे. भ्रष्टाचाराबाबत ओरड करणारी सामान्य जनता देखील भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे. निवडणुकीत आपले आणि पवित्र म्हटले गेलेले मत विक्रीला काढतात. चार आकडी पगार घेणारे देखील अनेकजण मतदानादिवशी पाकिटाची वाट पाहत असतात. लक्ष्मी भेटल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत अशी काही मंडळी देखील नेत्यांच्या भ्रष्टाचारावर बोलत असते.
"ज्यांची लायकी नाही अशांच्या हाती आपण देश सोपवून मोकळं झालो आहोत, आपण देशाचा विचार करीत नाही. नालायक राजकारण्यांना आपणच निवडून देतो, जे नालायक राजकारणी आहेत ते आपल्या देशाचा विचार करतील असे आपल्याला वाटतेय, पण त्यांनी मागच्या काही वर्षांत काय जे करून ठेवलंय आणि अजूनही काय करतात ते आपल्या समोर आहे" - अभिनेते सुबोध भावे
अभिनेते सुबोध भावे यांनी मात्र आज अत्यंत कडक शब्दात राजकारणाचे वास्तव मांडले आणि नालायक अशा शब्दात संबोधले आहे. (Actor Subodh Bhave strongly criticized political leaders)कलावंत मंडळी शक्यतो राजकीय मते व्यक्त करीत नाहीत पण सुबोध भावे यांनी मात्र अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे आपल्या मनातली खदखद शब्दबद्ध केली आहे आणि याची राज्यभर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सामान्य जनतेनेही या विधानाचे स्वागत केले आहे. सोशल मीडियावर देखील भावे याना जोरदार समर्थन मिळत आहे. "आपण लायकी नसणाऱ्याच्या हातात देश दिला आहे, राजकारण्यांच्या हातात देश देऊन काहीही होणार नाही. ते काय करतात हे आपल्या समोर आहे. मुंबई, महाराष्ट्रातून काही लोक निघून गेले तर पैसे राहणारच नाहीत " अशी वक्तव्ये काही राजकारणी धजावतात" असे म्हणत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानांचा देखील समाचार घेतला आहे.
राष्ट्रपुरुषांची विचार हवेत
आपण आपल्या मुलांना हिंदी, मराठी गाण्यावर नाचायला सांगत असतो, सिनेमातील संवाद सादर करायला लावतो, अलीकडे पुष्पा चितपटातील संवाद सादर करण्याचे एक खूळच आले आहे पण हे करून काय साधणार आहोत? नाच गाणी, चित्रपटातील संवाद यातून काही देश घडणार नाही, आपल्या मुलांना राष्ट्रपुरुषांचे विचार सादर करायला लावले तर त्यातून त्यांच्यात देशप्रेम, देशाबद्धल आत्मीयता निम्हण होईल असे देखील सुबोध भावे यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. राजकारण्यांवर त्यांनी केलेल्या प्रहाराचे सामान्य जनतेतून जोरदार स्वागत होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !