BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ फेब्रु, २०२२

पी ए ला पोलीस कोठडी, आ. नितेश राणेंचे काय ?



सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या पी ए ला पोलीस कोठडी देण्यात आली असून नितेश राणे यांच्याही जामिनावर आज अंतिम फैसला होणार आहे याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 


शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचे पी ए  राकेश परब  यांना चार फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. राकेश परब यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता त्यानंतर ते पोलिसांना शरण आले होते. त्यांना आज न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीचा आदेश दिला आहे.  त्यामुळे आता याच प्रक्ररणात भाजपचे आमदार नितेश राणे यांचे काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 


आ. नितेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतली पण त्यांना कुठेही दिलासा मिळालेला नाही. त्यांना पुन्हा जिल्हा न्यायालयात यावे लागले आहे. काल सोमवारी दोन्ही बाजूंचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले आहे आणि आज त्यावर फैसला येणार आहे. नितेश राणे याना 'जेल की बेल' याचा निर्णय आज दुपारनंतर येण्याची शक्यता आहे. अर्थातच कोकणाचे आणि राज्यातील राजकारणाचे लक्ष न्यायालयाच्या या निर्णयाकडे लागलेले आहे. 


जिल्हा न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू काल ऐकल्यानंतर आपला निकाल राखून ठेवला आहे आणि आज दिवसभरात तो निकाल दिला जाणार आहे. आज हा निकाल येणार असल्यामुळे जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !