BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ जाने, २०२२

या देशात रात्र असते फक्त चाळीस मिनिटांची !



लंडन : या पृथ्वीवर एकच असे ठिकाण आहे की येथे चोवीस तासातील केवळ चाळीस मिनिटेच रात्र असते आणि २३ तास २० मिनिटे सूर्य तळपत असतो ! विश्वसनीय असले तरी हे सत्य आहे !


बारा तासांची रात्र आणि बारा तासांचा दिवस हे आपल्याकडं ठरून गेलय ! हिवाळ्यात दिवस लहान असतो तर रात्र मोठी असते. दिवसभर काम करून थकलो की कधी एकदा रात्र होतेय आणि अंथुरणावर पडतो असं झालेलं असतं. पण रात्रच नसती तर ? कल्पना देखील सहन होत नाही ना? पण याच पृथ्वीवर असा एक भाग आहे की येथे सतत सूर्यप्रकाश असतो आणि चोवीस तासात केवळ ४० मिनिटांचीच रात्र असते. होय, युरोप खंडातील नॉर्वे या देशात केवळ ४० मिनिटांची रात्र असते. उत्तर ध्रुव प्रदेशातील हा देश आहे त्यामुळे येथे थंडी प्रचंड असते आणि विशेष नजारे येथे पाहायला मिळतात. नॉर्वे या देशात उन्हाळ्यात कधीच सूर्यास्त होत नाही असे म्हटले जाते. केवळ चाळीस मिनिटांची रात्र आणि उरलेल्या वेळी सूर्य प्रकाश असतो. 


येथे रात्री १२ वाजून ४३ मिनिटांनी सूर्यास्त होत असतो आणि केवळ चाळीस मिनिटानंतर पुन्हा सूर्योदय होतो. पावणे एक वाजण्याच्या दरम्यान सायंकाळ होते आणि लगेच दीड वाजता पहाटही होते. असा दिनक्रम तब्बल अडीच महिने सुरु असतो. इथल्या या परिस्थितीमुळे तर या देशाला 'कंट्री ऑफ मिडनाईट सन' असेही म्हटले जाते. मी महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत येथे सूर्यास्त होताच नाही. असाच प्रकार हेमरफेस्ट या शहरातही पहायला मिळतो. गेल्या शंभर वर्षांच्या काळात सूर्यकिरण पोहोचलेच नाही असेही एक ठिकाण याच नॉर्वे देशात आहे. चोहोबाजूनी असलेल्या ऊंचच उंच डोंगरामुळे शंभर वर्षात या ठिकाणी सूर्याचे किरण पोहोचू शकले नाही. 


 वाचा:>> त्यासाठी खालील लाईनवर क्लिक करा :







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !