BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ जाने, २०२२

आमदाराने दिली धमकी, 'मत द्या नाहीतर गावात राहू देणार नाही !

 




जालना : 'भाजपच्या उमेदवाराला मत द्या, नाहीतर गावात राहू देणार नाही!' अशी धमकी भाजपच्या निलंबित आमदाराने दिली आणि दगड घेवून धावले असल्याची तक्रार बदनापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 


नगरपंचातीच्या निवडणुकीत आत्ताच रंग भरू लागला असून आरोप प्रत्यारोपांनी निवडणूक रंगतदार होऊ लागली आहे पण आता ही निवडणूक थेट धमकी आणि  दगड इथपर्यंत येऊन पोहोचली आहे.  माजी सरपंच हरीकिसन पुजाजी होळकर यांनी या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात भाजप आमदार नारायण कुचे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. 'आपण बदनापूर शहराजवळील गणेशबाबा मंदिरात बसलेलो असताना आमदार नारायण कुचे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बाबासाहेब आणि गजानन कऱ्हाळे यांनी हातात दगड घेऊन भाजप उमेदवाराला मतदान करा नाहीतर गावात राहू देणार नाही' अशी धमकी दिली असे होळकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर तक्रारीवरून पोलिसांनी आमदार कुचे आणि अन्य दोघांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे 


आमदार कुचे यांनी हातात दगड घेऊन धावत धमकी दिली असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि शिवसेनेचे  माजी आमदार सांबरे यांचे बंधू भरत सांबरे यांनी केला आहे. दरम्यान भाजप आमदार नारायण कुचे यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. हे सगळे आरोप खोटे असून सूडबुद्धीने करण्यात येत आहेत,  नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे त्यामुळे असे खोटेनाटे आरोप कारण्यात येत असल्याचे आमदार कुचे यांनी सांगितले आहे.


ही बातमी वाचा, त्यासाठी खालील लाईनवर क्लिक करा :



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !