पुणे : सोलापूर जिल्ह्यासह चार जिल्ह्यातील तापमान ढासळणार असून उद्या रविवार पासून थंडीचा कडका पुन्हा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नव्या वर्षात थंडीने आपले चांगलेच अस्तित्व दाखवून दिले असून तपमानात मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. ग्रामीण भागात शेकोट्या पेटत असून लोक सकाळी लवकर घराबाहेर पडायला तयार नाहीत. गेल्या दोन दिवसांपासून किंचित थंडी कमी झाली असतानाचा सोलापूरश चार जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून थंडीपासून बचावाची तयारी आजच करण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसत आहे. पुणे आणि परिसरातील तापमान रविवारपासून घटणार आहे आणि त्याचा परिणाम शेजारच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचणार आहे. पुण्यासोबत कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील तापमान खाली ढासळणार आहे त्यामुळे या भागात कडाक्याची थंडी जाणवणार आहे. पुढील दोन दिवसात पुण्याचे किमान तपमान १० अंशाच्याही खाली येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील तपमान ३० अंश सेल्सियस पेक्षा अधिक नोंदले जात आहे आणि किमान तापमानात चढ उतार होत आहे. गेल्या दोन दिवसापासून अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. किमान तापमानाचा पार घसरणार असून पुण्यातील तपमान ९ ते १२ अंशाच्या दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील दोन दिवसात उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार असून हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोमवारपासून तर राज्यातील किमान तापमान २ ते ४ अंश सेल्सियसने घटणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून पुढील आठवडाही गारठ्याचा जाण्याची शक्यता दिसत आहे. थंडीपासून बचाव करण्याचा उपाय आजच शोधण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !