लातूर : कोरोनाची तिसरी लाट सुरु असतानाही राज्य शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला पण निलंगा तालुक्यातील एकाच शाळेतील तब्बल सोळा शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
कोरोनाची तिसरी लाट सुरु असताना आणि रोज प्रत्येक ठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असताना राज्य शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाने शाळेबाबत निर्णय घ्यावा असे सांगण्यात आले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचा भाजपने विरोध केला. काही पालक आणि विद्यार्थ्यातून शाळा सुरु करण्याची मागणी होत होती तर काही पालकांना हा निर्णय योग्य वाटला नाही. अर्थात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना शाळेत येणे बंधनकारक केलेले नाही.
शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार शिक्षकांचीही चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे त्यानुसार निलंगा तालुक्यातील कासार शिरशी येथील श्री करीबसवेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयातील सत्तावीस शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील सोळा शिक्षक कोरोना बाधित निघाले.उर्वरित शिक्षकांची चाचणी दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. एकाच शाळेतील सोळा शिक्षक एकदम कोरोना बाधित निघाल्याने पालक, विद्यार्थ्यात खळबळ उडालीच आहे परंतु जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
वाचा :> --म्हणून महिलेला सुनावली फाशीची शिक्षा !
बाधित झालेल्या शिक्षकांना विलगीकरणासाठी घरी पाठविण्यात आलेले असून उर्वरित शिक्षांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनासह अन्य दैनंदिन उपक्रम सुरु राहतील असे या माध्यमिक विद्यालयाने सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !