BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ जाने, २०२२

विठ्ठल मंदिरात मिळणार आता 'मोकळा श्वास' !

 



पंढरपूर : कुठल्याही मंदिरात गर्दी झाली की गरमरून जातं, देवाच्या गाभाऱ्यात तर हमखास गुदमरायला होतं पण आता पंढरीच्या विठ्ठल मंदिरात मोकळा श्वास घेता येणार आहे, अशी सुविधा फक्त पंढरीच्या विठ्ठल मंदिरातच असणार आहे. 


पुरातन मंदिरात वायुविजन व्यवस्थित होत नाही, आणि विठ्ठल मंदिर हे पुरातन म्हणजे सातशे वर्षांपुवीचे आहे. त्याकाळी काही खास कारणामुळेच तशी व्यवस्था केलेली नसावी पण भाविकांची गर्दी वाढली की मंदिरात मोकळा श्वास घेता येत नाही आणि भाविक गुदमरून जातो. ऑक्सिजन कमी पडत राहिल्यामुळे श्वसनास हमखास त्रास होतो. पण हा त्रास भाविकांना होऊ नये यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने ठोस उपाय करण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी यात्रेच्या गर्दीवेळी तर मंदिरात अधिक गुदमरून जायला होतं. मागच्या आषाढीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पूजेसाठी आले होते त्यावेळी आदित्य ठाकरे याना गुदमरले होते. त्यावेळी मंदिरातील ऑक्सिजनचा विषय समोर आला होता. 


मंदिरात, विशेषतः गाभाऱ्यात गुदमरून जाते. पुरेसा ऑक्सिजन मिळावा आणि भाविकांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात ऑक्सिजन कॉन्संट्रेटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि अशी सुविधा करणारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ही राज्यातील पहिलीच ठरणार आहे.  ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठीचा प्रस्ताव तयार असून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या सुविधेमुळे भाविकांची चांगली सोय होणार आहे. 


हे देखील वाचा : एका दिवसात एकट्याने तोडला सोळा टन ऊस !


  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !