सोलापूर : महावितरणकडून वीज बिल थकलेल्या ग्राहकावर कारवाई करण्याचा धडाकाच सुरु केला असून ९ हजार ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला असून विजेचा मीटरच काढण्याचे काम गतीने सुरु करण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळापासून महावितरण प्रचंड आर्थिक अडचणीत आले असून यातून मार्ग काढण्यासाठी महावितरणने थकीत वीज बील वसुलीसाठी धडक मोहीमच हाती घेण्यात आली आहे. प्रचंड थकबाकी असल्याने महावितरण कुणाचेही काहीही ऐकायला तयार नसून थकबाकी वसुलीला सर्वात अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार वसुली आणि धडक कारवाईची सपाटा महावितरणने सुरु केला असून तो अजूनही सुरूच राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील ८ हजार ९६५ ग्राहकांचा वीज पुरवठा आत्तापर्यंत खंडित करण्यात आला असून अजूनही ही मोहीम वेगाने सुरु ठेवण्यात आली आहे. घरगुती, व्यापारी, आद्योगिक अशा सर्वच ग्राहकांचा यात समावेश आहे. या ग्राहकांकडे २ कोटी ९९ लाख रुपयांची थकबाकी आहे त्यामुळे महावितरणने थेट कारवाई करून वीज पुरवठा खंडित केला आहे.
कोरोनाच्या काळात सगळ्यांचेच आर्थिक चक्र थांबले होते. उद्योग व्यापार सगळे काही बंद होते त्यामुळे बाजारात केवळ कुलूप पाहायला मिळत होते. त्याचा विपरीत परिणाम प्रयेकावर झाला आहे. या दरम्यान विजेची बिलेही ग्राहकांच्या पर्यंत पोहोचलेली नव्हती शिवाय कोरोना काळात विद्युत बिले शासन माफ करील अशी अनेकांना अपेक्षा होती. या काळात शासनाने अनेक घटकांना वेगवेगळ्या प्रकारे हातभार लावला होता. उद्योग धंदे बंद राहिल्याने आणि जनतेचे आर्थिक चक्र कोरोनाच्या गाळात रुतल्याने शासन वीज बिलाबाबत काही दिलासा देईल अशा आशेने अनेकांनी विजेचे बिल भरले नाही आणि त्यामुळे थकबाकीचा आकडा अधिकच फुगत गेला. फुगलेला हा आकडा महावितरणसाठी कठीण झाला तर ग्राहकांनाही एकदम एवढे बिल भरणे अशक्य झाले. परिणामी थकबाकी वाढत गेली.
कोरोनाच्या काळात विद्युत कर्मचारी घरोघरी भेटी देवून बिल भरण्याचे आवाहन करीत राहिले. विद्युत कर्मचारी पुरवठा खंडित करू लागताच टप्प्याटप्प्याने वीज बिल भरण्याची हमी ग्राहक देत राहिले पण प्रत्यक्षात बिले भरली गेली नाहीत. परिणामी थकबाकीचा आकडा फुगला आणि त्याची वसुली करण्यासाठी महावितरणला सक्ती करणे भाग पडू लागले आहे. त्यातूनच जवळपास ९ हजार ग्राहकांची वीज तोडण्यात आली आहे. थकबाकी असेलेल्या ग्राहकांची वीज तोडण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. टप्प्याटप्प्याने बिल जमा करण्याची तयारी ग्राहकाने दाखवून देखील महावितरण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांनी सरळ ग्राहकांचे वीज मीटर काढण्याचेच काम सुरु केले.
सदर कारवाई सुरु होताच अनेकांनी अंधाराच्या धास्तीने बिले भरली आहेत तर कित्येक जणांचा अंधारच सोबती उरला आहे. ग्राहकांना टप्प्याटप्प्याने वीज विल भरण्यासाठी मुदत दिली गेली पण तरीही ग्राहकांनी बिल न भरल्यामुळे कारवाई सुरु करावी लागली असून सोलापूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरूच असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. ज्या ग्राहकांनी अजूनही आपली थकबाकी भरली नाही त्यांचा वीज पुरवठा बंद करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली असून ती अधिक गतिमान करण्यात येत आहे त्यामुळे येत्या काही दिवसात अनेकांच्या घरात अंधार दिसण्याची शक्यता आहे.
---------------------------------------------------
---------------------------------------------------
वाचा : उजनीचे पाणी आज पूर्ण क्षमतेने कालव्यात येणार !
शाळा उघडण्याआधीच ३१ शिक्षकांना कोरोना !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !