BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० जाने, २०२२

सोलापूर : शाळा उघडण्याआधीच ३१ शिक्षक कोरोनाबाधित !

 




सोलापूर  : कोरोनाची तिसरी लाट सुरु असतानाही राज्य शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला पणप्रत्यक्षात शाळा सुरु होण्याआधी सोलापुरातील ३१ शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.  


कोरोनाची तिसरी लाट सुरु असताना आणि रोज प्रत्येक ठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असताना राज्य शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाने शाळेबाबत निर्णय घ्यावा असे सांगण्यात आले आहे.  राज्य शासनाच्या या निर्णयाचा भाजपने विरोध केला. काही  पालक आणि विद्यार्थ्यातून शाळा सुरु करण्याची मागणी होत होती तर काही पालकांना हा निर्णय योग्य वाटला नाही. अर्थात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना शाळेत येणे बंधनकारक केलेले नाही. 


शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार शिक्षकांचीही चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे त्यानुसार सोलापुरातील शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ३१ शिक्षक कोरोना बाधित निघाले. नुकतेच निलंगा तालुक्यातील एकाच शाळेतील तब्बल सोळा शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली  होती.  सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत हालचाली अंतिम टप्प्यात आल्या आहेत. लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक शाळा १ फेब्रुवारीपासून सुरु होतील.  दरम्यान दररोज सकाळच्या सत्रात चार तासच शाळा भरविण्यात यावी अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने शिक्षणाधिकारी यांना केली आहे.  


कोरोनाची स्थानिक परिस्थिती, शाळेतील विद्यार्थी आणि उपलब्ध वर्ग खोल्या, तसेच उपस्थिती यावर मुख्याध्यापक यांनी शाळेची वेळ निश्चिती करावी. जर विद्यार्थ्यांची अधिक उपस्थिती असेल आणि खोल्यांचे कमतरता असेल तर शाळा दोन शिफ्टमध्ये भरविण्यात यावी असेही शिक्षाधिकारी यांनी सांगितले आहे. परंतु शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना कोरोना चाचणीचे बंधन मात्र शासनानेच घातलेले आहे. त्यानुसार सोलापूर शहरातील ४ हजार ८५० शिक्षकांपैकी २ हजार ५७ शिक्षकांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले असून यात ३१ शिक्षक कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.  


सोलापूर शहर आणि जिल्यातील शाळा, महाविद्यालये सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला असला तरी त्या एवढ्यात सुरु होतील अशी परिस्थिती मात्र दिसत नाही. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी तीन टप्प्यात घेतली जाणार आहे त्यामुळे यासाठी वेळ लागणार आहे. कोरोना चाचण्या आणि लसीकरण या बाबी शाळा सुरु करण्यासाठी आवश्यक आहेत. शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे आढळून येऊ लागल्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्यास पालक कचरणार आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे पालक आधीच दोलायमान स्थितीत असताना शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे आढळत आहेत. अर्थात बाधित शिक्षकांना पंधरा दिवस घरी पाठविण्यात येणार आहे. ३१ जानेवारीस शिक्षण विभागातील अधिकारी यांची याबाबत महत्वाची बैठक होणार असून या बैठकीय काय निर्णय होतोय यावर बरेच काही अवलंबून आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !