BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ जाने, २०२२

शिवसेना बैठकीत राडा, आमदारांवर भिरकावली खुर्ची !

 




वैजापूर : शिवसेनेतील अंतर्गत वाद इतका उफाळून आला की आमदार रमेश बोरनारे यांच्या अंगावर खुर्ची फेकून मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सर्वांच्या समक्ष घडला आणि बैठकीऐवजी केवळ राडा आणि राडाच पहायला मिळाला. 


सत्ता आली की पक्षाच्या खऱ्या  कार्यकर्त्यावर अन्याय होतो हा अनुभव सगळीकडेच आहे. सत्तेमुळे पदाधिकारी याना दुसरेच मुंगळे चिकटतात आणि पक्षासाठी अविरत झटले बाजूला पडतात. पदाधिकारी कुणाशीही संधान साधतात आणि खरे कार्यकर्ते बाजूला पडत जातात. पदाधिकारी तर विना विमानाचे हवेत 'चालत' असतात आणि ज्यांच्यामुळे आपण एका पदावर आहोत त्यांनाच डावलण्याचे राजकारण सर्रास करतात. कार्यकर्ते काही काळ हे सहन करतातही पण कधी वेळ आणि अथवा संधी मिळाली की मग भर बैठकीत धिंगाणा घालतात आणि अनेक काळ मनात कोंडलेली वाफ मोकळी करून देतात. औरंगाबादच्या वैजापूर येथेही असाच प्रकार घडल्याचे आज समोर आले आणि आमदारच टार्गेट झाले.   


वैजापूर शहरात वसंत क्लबमध्ये शिवसेनेची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा तुफान प्रकार घडला आणि अंतर्गत कलह कुठल्या टोकापर्यंत जाऊन पोहोचलाय याचे दर्शन झाले. शाब्दिक खडाजंगी होता होता थेट एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत हे प्रकरण गेले आणि त्यांतंत्र शिवसेना माजी तालुकाप्रमुख आणि बाजार समितीचे माजी सभापती संजय निकम यांनी आमदार रमेश बोरनारे यांच्या अंगावर थेट खुर्ची फेकून मारली. शिवसेनेतील दोन गटात कार्यकर्त्यांची अंतर्गत खदखद होतीच पण ती आज अशा स्वरूपात बाहेर देखील पडली. बैठकीत किरकोळ वाद विवाद होतच असतात पण हा वाद एवढ्या टोकाला गेला निकम यांनी आमदारांना शिवीगाळ करीत खुर्ची फेकून मारण्यापर्यंत मजल गेली.  दोन्ही गटातील कार्यकर्ते परस्परावर धावून जात होते. उपनगराध्यक्ष साबेर खान यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. दरम्यान फक्त राडा आणि धिंगाणा एवढेच पाहायला मिळत होते आणि शिव्यांची लाखोली ऐकायला मिळत होती. 


शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात मागील काही काळापासूनच अंतर्गत नाराजीचे पडसाद उमटताना दिसत होते. रमेश बोरनारे आमदार झल्यानंतर या वादात वाढच झाल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यात पक्षवाढीसाठी परिश्रम घेणारे पदाधिकारी पक्षापासून दुरावले गेले आणि दोन तीन जणच तालुकायत पक्ष चालवत आहेत असा जोरदार आरोप या बैठकीच्या दरम्यान झाला होता. आजच्या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख संजय निकम यांनी पदाधिकारी यांच्यासंदर्भात असलेल्या तक्रारी सांगितल्या, पदाधिकारी कुणाला विश्वासात घेत नाहीत, बैठक आयोजित करीत नाहीत. पक्षाची अवस्था तालुक्यात अत्यंत वाईट झाली असून कुणाचाही वाचक राहिला नाही आणि परस्परात हेवेदावेच अधिक वाढले आहेत. यामुळे शिवसेनेचे तालुक्यातील आस्तित्व संपुष्ठात येऊ लागले आहे अशा तक्रारी निकम यांनी आंबादास दानवे यांचेकडे  केल्या आणि त्यानंतर काही वेळेतच या तुफान राडेबाजीला सुरुवात झाली.       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !