BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० जाने, २०२२

रस्ते चकाचक होताच अपघाती मृत्यूंत २० टक्क्यांनी वाढ !


 

नागपूर :  २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये रस्ते अपघातात तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून रुंद आणि सिमेंटचे रस्ते हे मृत्यूचे महामार्ग झाले आल्याचे दिसून येत आहे. 


मागील काही काळात सर्वच रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे हे सतत दिसत आहे. अरुंद आणि खड्ड्याचे रस्ते गायब होऊन त्या ठिकाणी चकाचक रस्ते बांधण्यात आले आहेत. सिमेंटचे आणि रुंद रस्ते प्रथमच दिसत असून वाहनांचे वेग प्रचंड झाले आहेत. या वेगावर नियंत्रण उरलेले नसून रोज आणि भीषण अपघात होऊ लागले आहेत. कित्येकांचे जीव रोज या रस्त्यावर जात आहेत. दळणवळण सोयीचे होण्यासाठी बांधण्यात आलेले हे रस्ते वाहनधारक आणि प्रवाशांच्या जीवावर उठलेले आहेत. पण आता आकडेवारीच समोर आली आहे आणि अपघाती मृत्यूत  तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 


जानेवारी २०२० ते नोव्हेंबर २०२० या अकरा महिन्यातील अपघाताच्या तुलनेत जानेवारी २०२१ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत अपघातात  अपघातात १८.३३ टक्के वाढ झाली आहे तर अपघाती मृत्यूत २०.०२ टक्के वाढ झाली आहे. रस्ते सुरक्षा समितीच्या नोंदीतून ही आकडेवारी समोर आली आहे. सदर आकडेवारी ही राज्यातील अपघातांची आहे. जानेवारी २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या काळात अकरा महिन्यात ३० हजार ५ अपघातांची नोंद झाली आहे त्यात ११ हजार ६३४ जणांचा मृत्यू झाला आहे जानेवारी २०२० ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत ही संख्या कमी झाली. २१ हजार ८९९ अपघात या कालावधीत झाले आहेत आणि या अपघातात १० हजार १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी २०२१ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राज्यात २६ हजार २८४ अपघात झाले आहेत आणि या अपघातात ११ हजार ९६० जणांचा मृत्यू झाला आहे. २०२० मधील तुलनेत २०२१ मध्ये त्याच कालावधीत १८.३३ टाकी अपघात आणि २०.०२ टक्के अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. अपघात आणि मृत्यूत झालेली ही वाढ चिंताजनक असून अत्यंत बेपर्वाईने वाहने चालविली जात आहेत. अनियंत्रित वेगाने अपघात आणि मृत्यू होत असून वाहनाच्या वेगावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाय योजना करण्याची गरज आहे अन्यथा ही टक्केवारी अशीच वाढत जाईल आणि मृत्यूंची संख्याही वाढत जाण्याचा मोठा धोका आहे.  







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !