BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० जाने, २०२२

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार !




मंगळवेढा : लग्नाचे आमिष देत साडे चार वर्षे बलात्कार आणि फसवणूक केल्याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 


पिडीत महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार डोणज येथील आकाश कलाप्पा केदार याने मिरज येथील एका ३० वर्षे वयाच्या महिलेची मोठी फसवणूक केली आहे. या महिलेस अपत्य असताना देखील, तिला लग्न करतो, तुला सांभाळतो, स्वतंत्र खोली करून तुला ठेवतो असे आमिष दाखवले आणि डोणज गावात स्वतंत्र खोली करून ठेवले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार करीत राहिला. मी तुझ्यासोबत लग्न करणारच आहे त्यामुळे तुला माझे सगळे ऐकावे लागेल  असे म्हणत तिला दम देत तिच्यासोबत १३ एप्रिल २०१७ ते १५ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत वेळोवेळी शरीरीक संबंध प्रस्थापित केले. 


पिडीत महिला चार महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आल्यावर संशयित आरोपीने तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिला. 'मी तुझ्याशी लग्न करतो पण आधी गर्भपात करून घे' असे म्हणत पिडीत महिलेला मारहाण तर केलीच पण तिला खोलीतून हाकलूनही दिले. त्यानंतर महिलेने मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित आरोपी आकाश कलाप्पा केदार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  


      

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !