BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ डिसें, २०२१

अखेर 'ती' सापडलीच ... पोलिसांना दोन वर्षांपासून देत होती गुंगारा !

 



सोलापूर : दोन वर्षांपासून सतत पोलिसांना गुंगारा देत होती पण पोलिसांनीही लढवली शक्कल आणि त्या आँटीला ठोकल्या बेड्या ! पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविले आणि पोलिसांना फसवणारी ती स्वतःच फसली ! 


सभ्य माणसांच्या सोसायटीत काही मुलींना हाताशी धरून वेश्या व्यवसाय चालविणारी सुप्रिया बालिका हिच्या शोधात पोलीस होते पण गेल्या दोन वर्षांपासून ती पोलिसांच्या हाती लागत नव्हती. गरजू आणि अडलेल्या महिलांना वेश्या व्यवसायात ढकलून त्यातून सुप्रिया पैसे मिळवत होती. पोलीस तिच्या मागावर असले तरी पोलिसांना सतत गुंगारा देण्यात ती यशस्वी होत होती. परिचयाच्या ग्राहकांना हव्या असतील तसे महिला पुरविण्याचे काम ती करीत होती. केवळ सोलापूर शहरापुरतेच नव्हे तर महाराष्ट्रासह अनेक राज्यातील महिलांशी तिचा जवळचा संबंध होता, दीड हजार रुपयांपासून वीस हजार रुपयांपर्यंत महिलांचा दर ठरवून ती आपला आर्थिक फायदा करून घेत होती. ग्राहकांकडून दीड हजार रुपये घेतले तर संबंधित महिलेला त्यातील फक्त आठशे रुपये ती देत होती.


सोलापूर येथील जुळे सोलापूर परिसरातील भीमानगर मधील सभ्य आणि नामांकित सोसायटीत महिलांना ठेवून त्यांच्याद्वारे सुप्रिया बालिका वेश्या व्यवसाय चालवत होती. काही करून तिला रंगेहात पकडण्याचा प्रयत्न पोलिसांनी सतत केला होता पण ती पोलिसांच्या हाती लागत नव्हती. अखेर सलगर वस्ती पोलिसांनी एक उपाय शोधला आणि तिच्याच परिचयाच्या एका व्यक्तीला बनावट ग्राहक बनवून पोलिसांनी तिच्यावर जाळे टाकले. या जाळ्यात ती अलगद अडकली आणि पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या.  या बनावट ग्राहकाने सुप्रियाशी संपर्क करून महिलांची मागणी केली. परिचयाची व्यक्ती असल्याने सुप्रिया सहज तयार झाली आणि दीड हजार रुपयांचा दर ठरवला. त्यानुसार जुळे सोलापूर येथील सिद्धेश्वर कॉम्प्लेक्स येथे महिलांना बोलावण्यात आले. 


सतत गुंगारा देत असलेली सुप्रिया हळूहळू पोलिसांनी टाकलेल्या जाळ्यात अडकत निघाली होती.   खाजगी वेषातील पोलिसांनी बनावट ग्राहकाला घेऊन दुचाकीवरून ते ठिकाण गाठले. ग्राहक येताच त्या महिलेने दीड हजार रुपये घेतले आणि सोसायटीतील त्या घरी नेले. तेथे गेल्यानंतर त्या ग्राहकाने सहायक पोलीस निरीक्षक इंद्रजित वर्धन याना मिस्ड कॉल केला आणि  त्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात सोलापूर येथील एक आणि मुंबई येथील एक अशा दोन महिला आढळून आल्या.  सुप्रिया बालिका हिच्या सांगण्यावरून आपण वेश्या व्यवसाय करीत असल्याचे या महिलांनी कबूल केले. पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या सुप्रिया बालिका  ( वानकर नगर, सूरज अपार्टमेंट ) हिच्या मुसक्या आवळल्या.  दोन वर्षांपासून आपण हा व्यवसाय करीत असल्याची कबुली तिने दिली असून अनेक धक्कादायक बाबी समोर येताना दिसत आहेत. तिच्या व्यवसायाचे धागेदोरे परराज्यापर्यंत पोहोचलेले असून पोलीस अधिक तपास करू लागले आहेत.   


वाचा : >> खुनाचे रहस्य उलगडले, सोळा वर्षाच्या मुलानेच केला बालकाचा खून   


वाचा : >>>  पंढरपूर तालुक्यातील पंधरा जणांना सक्तमजुरी !

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !