BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ डिसें, २०२१

पंढरपूर तालुक्यातील १५ जणांना सक्तमजुरीची शिक्षा कायम !

 



पंढरपूर  : मारहाण प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील पेहे येथील १५ जणांना झालेली सक्तमजुरीची शिक्षा अपिलात पंढरपूर सत्र न्यायालयाने कायम ठेवली असून सक्तमजुरीसहा दंडही ठोठावण्यात आला आहे.

टेप रेकॉर्डर चोरल्याच्या वादातून २ फेब्रुवारी १९९९ रोजी पंढरपूर तालुक्यातील पेहे येथे मारहाणीची एक घटना घडली होती. पेहे येथील बाळू राजाराम गायकवाड यांचा टेप रेकॉर्डर चोरीला गेला होता,  हा टेप रेकोर्डर पेहे येथीलच गोरख रंगनाथ पाटील याने चोरला असल्याचा संशय बाळू गायकवाड यास होता. या विषयावरून त्यांच्या वादही झालेला होता. मारहाणीच्या घटनेदिवशी फिर्यादी गोरख पाटील हा पंढरपूर येथून बाजार करून रात्री पेहे येथे पोहोचला असता एस टी तून उतरून आपल्या किराणा दुकानाजवळ आल्यानंतर त्यास जबर मारहाण झाली होती. 

पंढरपूर तालुक्यातील पेहे येथील मधुकर नारायण गायकवाड, ब्रह्मदेव आबाजी गायकवाड, सुनील हरी गायकवाड, बाळू राजाराम गायकवाड, मारुती नारायण गायकवाड, माधव गजेंद्र साळुंखे, पांडुरंग नारायण गायकवाड, बंडू हरी गायकवाड, सदाशिव नारायण गायकवाड,  हनुमंत नारायण गायकवाड, पैलवान नारायण गायकवाड, गणपत पांडुरंग गायकवाड, वैजुनाथ नवनाथ गायकवाड, रावसाहेब ब्रह्मदेव गायकवाड, महादेव गजेंद्र साळुंखे यांनी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी गोरख रंगनाथ पाटील यांना मारहाण केली. यावेळी गोरख पाटील यांचे पुतणे  पिंटू पाटील, सुनील पाटील आणि भाऊ लिंगाप्पा हे सोडविण्यासाठी मध्ये पडले असता त्यानाही मारहाण करण्यात आली आणि दुकानात कोंडले. यातील मारुती गायकवाड याने टेप रेकोर्डर आणून फिर्यादी गोरखा यांच्या हातात दिला आणि फोटो काढले. आणि पुन्हा काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत गोरख पाटील यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

सदर प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक सी. डी. जाधव यांनी बारकाईने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणी पंढरपूर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली होती आणि  न्यायालयाने सदर पंधरा आरोपींना भारतीय दंड विधान कलम ३८७, १४९ नुसार  ३ वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. कलम १४७ साठी प्रत्येकी  १ वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार दंड, ३२३/१४९ करिता प्रत्येकी ६ महिने सक्तमजुरी, ५०६/१४९ नुसार प्रत्येकी १ वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंड, ५०४/१४९ नुसार प्रत्येकी ३ महिने सक्तमजुरी आणि दंडाच्या रकमेपैकी जखमी व फिर्यादी यांना प्रत्येकी ३ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याची शिक्षा सुनावली होती. 

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या या शिक्षेच्या विरुद्ध आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर येथे अपील दाखल केले होते. आरोपींना खोट्या गुन्ह्यात गुंतवले आणि तपासण्यात आलेले साक्षीदार हे फिर्यादीचे नातेवाईक आहेत, साक्षीदारांच्या साक्षीमध्ये विसंगती आहे असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी जिल्हा व सत्र न्यायालयात केला आणि आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात यावे अशी मागणी केली. साक्षीदार हे नातेवाईक असले तरी घटनेतील ते जखमी साक्षीदार असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही तसेच साक्षीदारांच्या साक्षीत कसलीही विसंगती नाही. प्रथमवर्ग न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवण्यात यावी असा युक्तिवाद फिर्यादीच्या वकिलांनी केला. जिल्हा व सत्र नायालयाने सर्व बाजू तपासून आरोपींचे अपील नामंजूर करीत त्यांना ठोठावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली आहे. सरकार पक्षातर्फे एड. सारंग वांगीकर यांनी कामकाज पहिले.      

हे देखील वाचा >>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !