BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ डिसें, २०२१

अरेच्चा ! आमदार साहेबांनी तर केला असा 'उलटा प्रवास' !



अकोट : शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले माजी आमदार संजय गावंडे यांनी उलट राजकीय प्रवास केला असून ते आता ग्रामपंचायत सदस्य बनले आहेत.


गड्याचा गवंडी होतो, शिपायाचा साहेब होतो असा प्रघात आहे.  गवंड्याचा कधी गडी होत नाही आणि साहेबाचा कधी शिपाई होत नाही पण राजकारणात काहीही घडू शकते. राजकारणात महत्वाकांक्षा ठेवत ग्रामपंचायतीच्या सदस्य पदापासून आमदार, खासदार होण्याची स्वप्ने पहिली जातात. ज्यांची राजकीय कारकीर्द ग्रामपंचायत सदस्य अथवा सरपंच येथून सुरु झाली ते पुढे आमदार, खासदार नव्हे तर राज्याचे मंत्रीही बनले आहेत. बाभूळगावच्या सरपंचपदापासून स्व. विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री बनले होते.  राजकारणात एकेक पायरी वर चढण्याची पद्धत आहे पण अकोट जिल्ह्यात वेगळाच प्रकार समोर आला.  शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे हे आमदारकी उपभोगून आता चक्क ग्रामपंचायत सदस्य बनले आहेत. 


जरूर वाचा >>>>

सोळाव्या वर्षी बलात्कार, ५५ व्या वर्षी पिडीत महिला म्हणतेय,---


अकोला जिल्हातील अकोट विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर संजय गावडे हे निवडून आले होते आणि शिवसेनेचे आमदार बनले होते. त्यांची ही आमदारकीची कारकीर्दही गाजणारी ठरली होती. आमदारकी गाजवलेल्या या आमदार साहेबांनी आता चक्क ग्रामपंचायत सदस्य होण्यात समाधान मानले असून मरोडा ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून ते बिनविरोध निवडूनही आले आहेत. आमदारकी ते ग्रामपंचायत सदस्य असा त्यांनी उलट प्रवास केला असून राजकारणात याची चर्चा सुरु आहे. तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणासाठी त्यांनी ही निवडणूक लढवली असल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे.  


वाचा >>   सोलापूर जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी !


अकोट तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत माजी आमदार संजय गावंडे हे ग्रामपंचायत सदस्य बनले आहेत. या निवडणुकीत १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून यात गावंडे यांचा समावेश आहे.  या पोटनिवडणुकीत फारसा रस घेतला गेल्याचे दिसून आले नाही पण अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणासाठी अनेकांनी अशाच प्रकारे उलट राजकीय प्रवास केल्याचे मात्र या निवडणुकीत दिसून आले आहे. भविष्यात होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे नजर ठेवून हा उलटा प्रवास केला असल्याची मात्र जिल्हाभर चर्चा सुरु झाली आहे. किमान महाराष्ट्रात तरी कदाचित हे पहिलेच उदाहरण असण्याची शक्यता आहे.  


हे वाचा :  दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !