BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ डिसें, २०२१

सोळाव्या वर्षी बलात्कार, पंचावन्नाव्या वर्षी पिडीत महिला म्हणतेय ---



अहमदाबाद : 'साहेब, सोळाव्या वर्षी बलात्कार झाला आणि माझ्या वयाला आता ५५ वर्षे झालीत.. ४१ वर्षांपासून खटला कोर्टात सुरु आहे, आता बंद करून टाका ही केस '! अशी विनंतीच एका बलात्कार पीडितेने न्यायालयाला केली आहे.   


'तारीख पर  तारीख, तारीख पर  तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है मगर इन्साफ नही मिला मिलॉर्ड... '   हा दामिनी चित्रपटातील सनी देओल यांचा संवाद नेहमीच उच्चारला जातो आणि प्रत्यक्षात याचा अनुभवही घेतला जातो. कारण कुठलेही असो, पण न्याय मिळण्यात प्रचंड आणि कधी कधी अक्षम्य विलंब लागतो याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो. न्याय मिळण्यास विलंब लागणे म्हणजे न्याय नाकारल्यासारखेच मानले जाते. अनेक खटल्यात तर न्याय मागणारा नसर्गिक मृत्यूने जग सोडून जातो पण त्याला न्याय मिळालेला नसतो तर कित्येक खटल्यात पन्नास वर्षाहून अधिक काळ गेला तरी न्यायालयाचा निकाल आलेला नसतो. आजोबाने दाखल केलेल्या प्रकरणी नातवाला निकाल मिळतो. न्यायालयाच्या प्रक्रियेत अनेक गतिरोधक असतात पण न्याय मागण्यासाठी न्यायालयात गेलेल्या व्यक्तीस त्याच्या हयातीत न्याय मिळाला नाही तर अशा न्यायाचा उपयोग तरी काय ? असा सवाल अनेकदा उपस्थित होत असतो. असाच अनुभव एका बलात्कार पीडितेने घेतला आहे. 


'तारीख पर  तारीख, तारीख पर  तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है लेकिन इन्साफ नही मिला मिलॉर्ड... इन्साफ नही मिला ... मिली है तो सिर्फ ये तारीख .. !' 'दामिनी चित्रपटातील हा संवाद जसाच्या तसा अनुभवलाय एका बलात्कार पीडितेने ! सोळा वर्षाचं वय असताना बलात्कार झाला आणि ४१ वर्षे कोर्टात हेलपाटे घातले पण न्याय नाही मिळाला !


बलात्कारासारख्या गुन्ह्यात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी घेतली जावी अशी अनेकदा मागणी होत असते आणि अलीकडे अशा घटनात वेगवान सुनावणी केली जाते. अत्यंत जलद न्याय मिळाल्याच्या काही घटना अलीकडेच घडल्या आहेत पण अहमदाबाद येथील बलात्कार पीडित आता या सुनावणीलाच वैतागली आहे आणि तिने न्यायालयाला विनंती करून 'बंद करा हा खटला' असे सांगितले आहे. अहमदाबाद सत्र न्यायालयात बलात्काराचा एका खटला प्रलंबित आहे.  तब्बल ४१ वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरु आहे पण अद्याप या खटल्याचा निकाल लागला नाही की पीडितेला न्याय मिळाला नाही.  खटला दाखल करणाया महिलेवर ती सोळा वर्षाची होती तेंव्हा तिच्यावर बलात्कार झाला होता. बलात्कार करणाऱ्या नराधमाला शिक्षा मिळेल आणि त्याला अद्दल घडेल, शिवाय आपल्याला न्याय मिळेल या आशेने या महिलेने पोलिसात तक्रार केली पण 'तारीख पर तारीख .. तारीख पर तारीख' हाच अनुभव या महिलेने तब्बल ४१ वर्षे घेतला आणि आता ती या सर्व प्रकाराला कंटाळून गेली आहे आणि न्याय मिळवायलाही आता तिने नकार दिला आहे.     


सोळाव्या वर्षी झालेल्या बलात्काराची तक्रार दिलेल्या या महिलेचे वय आता ५५ वर्षांचे झाले आहे. न्याय मिळेल या आशेवर ती गेल्या ४१ वर्षांपासून न्यायालयात खेटे घालत आहे. मुंबईतील एका टॅक्सी चालकाने ३० जून १९८० रोजी आपल्यावर बलात्कार केल्याचे या पिडीतेचे म्हणणे आहे. नराधमास शिक्षा होऊन आपल्याला न्याय मिळेल अशी आशा वाटत राहिल्याने ४१ वर्षांपासून ती न्यायालयाच्या दरवाजात पोहोचत आहे पण तिच्या नशिबात केवळ न्यायालयाच्या तारखा येत राहिल्या आहेत.  वर्षानुवर्षे केवळ सुनावणीच्या होत राहिली आणि  पीडित महिला फक्त तारीख घेत राहिली. या तारखांचाही आता या महिलेला इतका कंटाळा आलाय की नराधमाला शिक्षा नाही झाली तरी चालेल या मानसिकतेपर्यंत ही पिडीत महिला पोहोचली  आहे. 


'तारीख पर तारीख..' ला वैतागलेल्या या पीडित महिलेच्या बलात्काराची सुनावणी अहमदाबाद सत्र न्यायालयात न्यायमूर्ती डी. एम. व्यास यांच्या खंडपीठासमोर सुरु आहे. ही सुनावणी सुरु असतानाच पीडित महिलेने ही केस बंद करून टाकण्याची विनवणी न्यायालयाला केली आहे. 'माझे वय आता ५५ वर्षांचे आहे, बलात्काराच्या घटनेला आता ४१ वर्षे उलटून गेली आहेत. आणखी काही काळ या सर्व कायदेशीर प्रक्रियेचा भाग बनण्याची माझी इच्छा नाही, त्यामुळे हा खटला बंद करण्यात यावा' अशी विनंती या पिडीत महिलेने  न्यायालयाला केली आहे.  

----------------

जरूर वाचा :



----------------


पिडीत महिलेच्या या विनंतीतच न्यायदान प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एवढा विलंब लागणे म्हणजेच या महिलेला न्याय नाकारल्यासारखे आहे. न्याय मिळण्यासाठी न्यायदेवता असते पण न्यायदेवतेच्या या दरबारात एका महिलेला ४१ वर्षे न्याय मिळतच नाही. मग गुन्हेगाराला शिक्षा कशी आणि कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. 'न्याय नको पण तारीख आवरा' अशी जर पिडीतांची अवस्था होऊ लागली तर न्यायावर कितपत विश्वास राहू शकेल याचाही विचार होणे आवश्यक आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्याचे हे एकमेव ठिकाण आहे आणि तेथेच जर पूर्ण हयात गेली तरी न्याय मिळणार नसेल तर न्यायासाठी आता कुठली दारे वाजवायची याचेही उत्तर कुणी देणे आवश्यक आहे.      



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !