BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ डिसें, २०२१

वडिलांच्या माराच्या भीतीने त्याने केला लहान मुलाचा खून !



 


तुळजापूर : वडिलांच्या माराच्या भीतीने अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने अवघ्या पाच वर्षे वयाच्या बालकाचा खून केल्याची बाब पोलीस तपासात समोर आल्याने पुन्हा एकदा या घटनने खळबळ उडून दिली आहे. 


तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी या गावातील एका पाच वर्षे वयाच्या बालकाची हत्या केल्याने तुळजापूर तालुका हादरलेला आहे आणि  या घटनेतील एकेक घटना पोलिसांच्या तपासात समोर येऊ लागली आहे. अकरावीत विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने पाच वर्षाच्या बालकाचा खून करून पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची बाब पोलिसांनी उघड केली आहे परंतु बालकाने चिडवल्यामुळे रागाने त्याने हे कृत्य केले होते अशी माहिती सुरुवातीला बाहेर आली होती पण आता वेगळी आणि धक्कादायक बाब समोर आली आहे. 


सदर बालकाच्या खूनप्रकरणी पोलीसानी अकरावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडे बारकाईने चौकशी सुरु केली आहे. या चौकशीत आता अधिक माहिती समोर आली असून वडिलांचा मार खावा लागेल या भीतीने या विद्यार्थ्याने पाच वर्षे वयाच्या बालकाची हत्या केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.  आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील सैन्यात मेजर पदावर आहेत. अकरावीत शिकणाऱ्या या मुलाने ऑनलाईन गेम खेळताना पैसे हरले होते. या खेळत हरलेले पैसे भरण्यासाठी त्याच्याकडे काही पर्याय नव्हता आणि भरपाई करण्यासाठी वडिलांकडे पैसे मागितले असते तर मार खावा लागला असता.  अखेर त्याचे लक्ष शेजारच्या पाच वर्षे वयाच्या बालकाच्या कानाकडे गेले. या बालकाच्या कानात सोन्याची कुंडले होती त्यावर डोळा ठेवला आणि या मुलाचा गळा आवळून खून केला. कानातील कुंडले काढून घेतली. पोलिसांनी त्याच्याकडून ही कुंडले आणि गळा आवळण्यासाठी वापरलेली दोरी ताब्यात घेतली आहे.  


मोठी बातमी ! वाचा :>>  पंढरपूर, सोलापूरच्या वेशीवर आला ओमीक्रॉन  !


अवघ्या सोळा वर्षाच्या या आरोपीने सगळे काही थंड डोक्याने या बालकाचा खून केला आणि नंतर त्याने मृतदेहाच्या कानातील बाळी/ कुंडले काढून घेतली आणि आपल्या बुटात लपवली. एवढ्यावर तो थांबला नाही तर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न त्याने सुरु केला. मृतदेहावर गादी आणि अन्य काही समान टाकून मृतदेह एका पडक्या घरात नेऊन टाकला. हा सर्व प्रकार अकरावीत शिकणाऱ्या मुलाने केला हे आश्चर्यजनक आहे.  बालकाची हत्या करून मृतदेह  नेऊन टाकल्यावर त्याने पुढच्या परिणामाचाही विचार सुरु केला. खून केला म्हणून अल्पवयीन मुलाला किती शिक्षा होते हे जाणून घेण्यास त्याने सुरुवात केली. रात्रभर इंटरनेटवर शोध घेत तो याची माहिती मिळवत असल्याचेही तपासात समोर आले. पुरावा नष्ट करण्यासाठीच त्याने रात्रभर 'क्राईम पेट्रोल' ही मालिका पहिली असल्याचेही त्याने सांगितले आहे.  


अल्पवयीन मुलाने केलेल्या या कृत्याने पोलीसही हादरून गेले आणि परिसरात या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. अकरावीत शिकणारा मुलगा एवढे काही करू शकतो यावर सहजासहजी कुणाचा विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी मात्र काही तासात या खुनाचे रहस्य उलगडले आहे. आधी गेममध्ये पैसे हरले आणि त्याची भरपाई करण्यासाठी पैशाची गरज भासली. ही गरज पूर्ण करण्यासाठी वडिलांना मागणी केली तर पैशाऐवजी मार खावा लागेल म्हणून त्याने एका लहान बालकाचा जीव घेतला. ही घटनाच मुळात गंभीर असून आपली मुले मोबाईल आणि संगणकावर नक्की काय करतात याकडे पालकांचे लक्ष असणे किती आवश्यक आहे हेच ही घटना सांगून जात आहे. 


हे देखील वाचा : >>> अखेर ती सापडली ! सोलापूर पोलिसांना दोन वर्षे देत होती गुंगारा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !