BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० मार्च, २०२२

सोलापूर जिल्ह्यासह १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट !

 



पुणे : राज्यातील सोलापूर जिल्ह्यासह १४ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून आज 'यलो अलर्ट' जाहीर केला असून वेगवान वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाउस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ( Non seasonal rain and hailstorm)


उन्हाळा सुरु झाला असतानाही राज्यातील काही भागात पर्जन्यवृष्टी झाली असून गारपीठ देखील होताना दिसत आहे त्यामुळे शेतकरी धास्तावलेले आहेत. राज्यातील काही भागात पिके आडवी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.  नंदुरबार, धुळे, नाशिक परिसरात पावसासह गारपीट झाली आहे. राज्यात आजही पावसाची स्थिती असून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे तुरळक ठिकाणी पाउस होईल असा अंदाज हवामान विभागाने आज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, परभणी, धुळे, हिंगोली, नंदुरबार या जिल्ह्यातही पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या मात्र काही जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी होईल परंतु पुणे, घाट परिसर, मराठवाड्याचा काही भाग आणि कोकणात ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. 


आजच्या दिवसासाठी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, पुणे सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव या चौदा जिल्ह्यांचा यात समावेश आहे.  या ठिकाणी वेगवान वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सारी कोसळण्याची शक्यता आहे, तुरळक ठिकाणी गारापीठ देखील होऊ शकते आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. 

हे देखील वाचा :


वाचा : शिक्षकाची आत्महत्या नव्हे, बायकोनेच काढला काटा !  


 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !