शोध न्यूज : कायद्याचे रक्षक म्हणविणाऱ्यानेच कायदा पायाखाली तुडविल्याची आणखी एक घटना घडली असून, पोलिसानेच एका गरीब आणि कष्टकरी महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने पोलीस दलात देखील खळबळ उडाली आहे.
कायद्याचे रक्षण करण्याची मोठी जबाबदारी पोलीस दलावर असते पण अनेकदा पोलीसच कधी कायदा वाकवत असतात तर कधी गुंडाळून ठेवतात. कधी हाच कायदा पायाखाली तुडवताना दिसत असतात. पोलिसांनीच कायद्याचा आदर केला नाही तर सामान्य माणसाना ते कुठल्या तोंडाने कायदा पाळायला सांगणार असा प्रश्न पडण्यासारखी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील एका आश्रम शाळेतील मुलांना आणण्यासाठी गेलेल्या, जामखेड तालुक्यातील आदिवासी महिलेवर पोलिसानेच बलात्कार केला आहे. भूम येथील हा पोलीस असून त्याने होमगार्डची मदत घेत या महिलेवर बलात्कार केला असल्याचे समोर आले आहे. साहजिकच या घटनेने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसानेच हे कृत्य केल्याने जनतेतून मात्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
भूम पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी दगडू सुदाम भुरके आणि सागर चंद्रकांत माने या दोघांच्या विरोधात भूम पोलीसानी बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आवळा येथील आदिवासी कुटुंब नायगाव येथे ऊस तोडण्याचे काम करीत आहे. हे कुटुंब ऊस तोड कामगार असल्यामुळे यातील पिडीत महिला आणि तिचा दीर यांची मुले सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या येवली आश्रम शाळेत शिकत आहेत. आश्रम शाळेत शिकणारी ही मुले शाळेतून पळून गेली असल्याची माहिती या कुटुंबाला मिळाली होती, त्यामुळे सदर महिला आणि तिचा दीर बार्शीकडे निघाले होते. खर्डा येथून ते भूमकडे जात असताना भूम येथील बस स्थानकावर पोहोचल्यानंतर ते पुढील बसची वाट पहात थांबले होते. त्यांना पाहून एक व्यक्ती तेथे आला आणि त्यांची चौकशी करू लागला. पोलीस असल्याचे सांगत तो या पिडीत महिलेला आणि सोबत असलेल्या दिराला धमक्या देऊ लागला. येथे का थांबला आहात? तुम्ही चोर असल्याचा संशय येत आहे, असे म्हणत पोलीस स्टेशनला घेवून जावे लागेल असे त्याने सांगितले. कुणाला तरी फोन करून त्याने गाडी घेवून बस स्थानकावर येण्यास देखील सांगितले.
काही वेळेत एक चार चाकी गाडी तेथे आली आणि त्यांनी या महिलेला दहा हजार रुपये दे नाहीतर गुन्हा द्काहाल करावा लागेल अशी धमकी दिली. महिला जीव तोडून त्यांना सांगत राहिली पण तिचे ऐकण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. आपण ऊसाची तोड करणारे कामगार आहोत असे सांगूनही त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. गरीब आदिवासी महिलेकडे, पोलिसांना देण्यासाठी पैसे नव्हते. अखेर तिने उस तोड कामगारांचे मुकादम असलेल्या नंदू उगले यांना फोन केला आणि पैसे पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार मुकादमाने होमगार्ड असलेल्या सागर माने याच्या खात्यावर फोन पे च्या माध्यमातून पैसे पाठवले. मागणी केल्याप्रमाणे दहा हजार रुपये मिळाले तरी देखील या कायद्याच्या कथित रक्षकांचे समाधान झाले नाही. "चला, तुम्हाला बार्शीच्या एस टी त बसवून देतो' असे म्हणत पोलीस दगडू भुरके याने, त्यांना परांडा रस्त्याकडे घेवून गेले. त्यानंतर त्याचे आणखी काळे प्रयत्न सुरु झाले. पिडीत महिलेच्या दिराला तेथेच थांबायला सांगत तो म्हणाला, 'पोलीस ठाण्यातून फोन आला आहे. तू मॅडमला भेटायला चल" असे सांगू लागला.
पोलीस ठाण्यातील या कथित मॅडमची भीती तो पिडीत महिलेला घालू लागला. 'तुला मी सोडवतो, तुझ्या दिराला देखील यात अडकू देत नाही पण माझ्याशी शारीरिक संबंध ठेव' असे म्हणू लागला. (Poor woman raped by police) पिडीत महिलेने हात जोडून विनंती केली, काही झाले तरी मी असे काही करणार नाही असे ती गयावया करून सांगत राहिली पण त्या पोलिसांवर याचा काहीही परिणाम होत नव्हता. अचानक आलेल्या संकटाने ती घाबरून गेली होती, ती नाही नाही म्हणत असतानाही त्या पोलिसाने तिला जवळच्या ज्वारीच्या शेतात नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेची माहिती तिने आपल्या वडिलांना आणि मुकादमाला फोन करून सांगितली. त्यामुळे हे प्रकरण अखेर पोलीस ठाण्यात गेले आणि भूम पोलिसांनी नराधम पोलीस आणि होमगार्ड यांचं विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. महिलांना गुंडापेक्षा पोलिसांकडूनच अधिक धोका असल्याचे या घटनेतून समोर आले असून जनतेतून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !