मंगळवेढा : पंढरपूरकडे विक्रीसाठी येणारा १८ लाखाचा गुटका मंगळवेढा पोलिसांनी पकडला असून पंढरपूर येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडील काळातील हे सर्वात मोठी कारवाई आहे.
चडचण येथून अशोक लेलँड कंपनीचे एक चार चाकी वाहन गुटखा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला आणि या सापळ्यात हा गुटका मिळाला. एम एच १३ डी क्यू६९० या वाहनाला पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता चालक सुरज अनिल खताडे (भक्ती मार्ग, पंढरपूर) आणि त्याच्या सोबत असलेला वैभव विजयकुमार जगताप (विणे गल्ली, पंढरपूर, मूळ रा. कवठे महांकाळ) यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
सदर वाहनातून गुटख्यासारखा वास येत होता त्यामुळे पोलिसांनी तपासणी केली असता गुटख्याची पोती आणि बॉक्स आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी पंढरपूर येथील दोघांना ताब्यात घेतले. या दोघांनी सदर माल मंगळवेढा आणि पंढरपूर तसेच अन्य ठिकाणी विक्री करण्याकरिता घेऊन जात असल्याची माहिती दिली. या वाहनात विमल पान मसाला, तंबाखू, हिरव्या रंगाचा विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू, आर एम डी पान मसाला, आर एम डी सुगंधित तंबाखू, यासह वाहन असे २४ लाख ९५ हजार २०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. १७ लाख ९५ हजार २०० रुपयांचा गुटका पोलिसानी पकडण्याची ही मोठी घटना असून अलीकडील काळातील ही मोठी कारवाई आहे.
अन्न भेसळ विभागाचे सहाय्यक आयुक्त उत्तम भुसे यांनी याबाबत फिर्याद दिली असून भारतीय दंड संहिता काळ १८८, २७२, २७३, ३२८ या सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम २००६ च्या विविध कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चालक सुरज अनिल खताडे (भक्ती मार्ग, पंढरपूर) आणि त्याच्या सोबत असलेला वैभव विजयकुमार जगताप (विणे गल्ली, पंढरपूर, मूळ रा. कवठे महांकाळ) या दोघांच्या विरोधात मंगळवेढा पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !