BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ मार्च, २०२२

महादेवाचा नंदी दूध प्यायला लागला आणि ---

 



औरंगाबाद : मंदिरातील महादेवाचा नंदी दूध प्यायला लागला आणि या नंदीला दूध पाजण्यासाठी महिलांनी एवढी गर्दी केली की अखेर पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. 


काही वर्षांपूर्वी गणपतीची मूर्ती  दूध  पीत असल्याची अफवा महाराष्ट्रभर पसरली होती आणि राज्यात प्रत्येक गावातील लोक दुध घेवून गणपती मंदिरात जमा झाले होते. यावेळी हा विषय प्रचंड चर्चेचा झाला होता आणि जो तो दुधाचा चमचा गणपतीच्या तोंडाला लावला होता. प्रत्येक गणपती मंदिराच्या समोर भाविकांच्या रांगा लावल्या होत्या. विज्ञानाने प्रचंड प्रगती केली असली तरी अजूनही अंधश्रद्धा माणसांच्या मनातून गेली नाही हे आता पुन्हा सिद्ध झाले आहे. महादेवाचा नंदी दूध पीत असल्याची अफवा पसरली आणि महिलांची तुफान गर्दी नंदीला दूध पाजण्यासाठी झाल्याची घटना काल घडली. नंदी, महादेवाची मूर्ती, कासव हे दूध पीत असल्याचे भारतभर सोशल मिडीयावर पसरत राहिले. 


मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मूर्तींना दूध पाजण्यासाठी महिला आणि भाविक यांच्या रांगा लागल्या होत्या. हेच चित्र संपूर्ण भारतात दिसून आले आणि विज्ञानयुगात देखील अंधश्रद्धा किती प्रबळ आहे याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. औरंगाबाद येथील पांढुर्ली येथील तेली गल्लीत महादेव मंदिर आणि चुंचाळे शिवारात महिला आणि भाविक यांची प्रचंड गर्दी उसळली.  महादेवाच्या नंदीच्या मुर्तीला तोंडाला दुधाचा चमचा लावला जात होता आणि  या चमचातील दूध मूर्तीच्या तोंडात जात होते. याचे व्हिडीओ तयार करून ते समाज माध्यमांवर व्हायरल केले जात होती. त्यामुळे प्रत्येक जण मोठ्या श्रद्धेने हे व्हिडीओ पाहात होते आणि मंदिराकडे वळत होते. 


ही तर अंधश्रद्धा !

हा कुठल्याही प्रकारचा चमत्कार नसून नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.  मूर्तीत दूध आकर्षित होत असले तरी यामागे वैज्ञानिक कारण आहे, द्रवाचा पृष्ठीय तणाव असतो त्यामुळे वैज्ञानिक नियमांच्या आधाराने हे पहायला मिळते. कोणतीही निर्जीव असणारी वस्तू पाणी पीत नसते हे वैज्ञानिक सत्य असून नंदीची मूर्ती पाणी ओढून घेते हे केवळ पृष्ठीय ताण आणि केशाकर्षण यामुळे घडते. हे केवळ वैज्ञानिक तत्व असून कसलाही दैवी चमत्कार नाही त्यामुळे भाविकांनी अशा घटनांना बळी पडू नये असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. (Rumors of inanimate idols drinking milk) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !