BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ एप्रि, २०२२

सहा हजार 'आकडे बहाद्दरां' वर कारवाई !

 


सोलापूर/ बारामती : राज्यात विजेची मोठी तुट जाणवत असताना महावितरणच्या बारामती परिमंडळात अवघ्या पाच दिवसात सहा हजाराहून अधिक आकडेबहाद्दर मंडळीवर कारवाई करण्यात आली आहे. 


गेल्या सहा महिन्यापासून राज्यातील महावितरण चर्चेत आणि वादात आहे, थकित वीज देयकासाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्यात येत होते त्यामुळे मोठा वादंग झाला आणि शासनाने काही काळापुरती सवलत दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश काही प्रमाणात कमी झाला. शेतीसाठी दिवसा वीज देण्यात यावी ही मागणी मात्र कायम असून महावितरण त्यासाठी प्रयत्न करीत आहे परंतु उन्हाळ्याचे दिवस सुरु होताच मागणी वाढली असतानाच कोळसा टंचाईमुळे वीज कंपनी पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. मागणीपेक्षा विजेचे उत्पादन अत्यंत कमी झाल्याने भारनियमन आणि बाहेरून वीज विकत घेण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थिती देखील विजेची मोठी चोरी सुरूच असल्याने पुन्हा एकदा समोर आले आहे. 


महावितरण बारामती परिमंडळाने वीज चोराविरुध्द मोहीम चालूच ठेवली असून या परिमंडळात सोलापूर, सातारा, पुणे अशा काही जिल्ह्यांचा समावेश आहे. पाच दिवसात ६ हजार २०१ आकडे बहाद्दर वीज चोरांवर कारवाई केल्याची आकडेवारी समोर आली आहे. या कारवाईमुळे वीज यंत्रणेवर आलेला वाढीव ताण कमी होण्यास मदत झाली आहे. परिमंडळातील ४८९ ओव्हर लोड असलेल्या फिडरवरील कारवाई करीत असताना ६ हजाराहून अधिक आकडे काढून टाकण्यात आले यामुळे तब्बल १७४  मेगावॅट एवढ्या वाढीव विजेचा ताण कमी झाल्याचे आढळून आले.   शंभर अम्पियर पेक्षा अधिक लोड असलेल्या ४८९ फीडरवरील वीज चोरीचे आकडे काढून टाकण्यात आले. सदर कारवाई करण्यापूर्वी सदर फिडरवरील लोड १ हजार ७२८ मेगावॅट होता तो कारवाईनंतर १ हजार ५५४ मेगावॅटवर आला ४८९ पैकी १२६ फिडरचा लोड दहा टक्क्यांनी कमी झाला आहे. 


स्वतःच आकडे काढले 
महावितरणने वीज चोरांच्या विरोधात धडक कारवाई सुरु करून केबल, स्टार्टर,जप्त करण्यात येत असल्याचे दिसताच हजारो शेतकऱ्यांनी टाकलेले आकडे त्यांनी स्वतःच काढून टाकले आणि वाढीव भार कमी होण्यास वेगाने मदत झाली. (Action against six thousand power thieves) महावितरणची कारवाई अशीच पुढे सुरु ठेवली जाणार आहे. 


सोलापुरात साडे तीन हजार 

सोलापूर महावितरण मंडळात ३ हजार २१ आकडे बहादार वीज चोर्नाच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. आकडे काढून स्टार्टर, पंप, केबल असे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी अचानक शिवारात जाऊन पंपाची तपासणी करीत आहेत. यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.    


हे वाचले काय ? :   (बातमीवर क्लिक करा )



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !