BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ फेब्रु, २०२४

ईव्हीएम नको, सोलापूर जिल्ह्यातील ग्राम पंचायतीचा ठराव !

 



शोध न्यूज : मतदान यंत्राबाबत देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना आता गाव पातळीवरून विरोध होऊ लागला  असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील  महूद ग्रामपंचायतीने याबाबत एक  ठरावच केला  आहे.


गेल्या काही वर्षांपासून देशातील निवडणुका या मतदान यंत्रामार्फत घेण्यात येत आहेत परंतु या प्रकियेवर देशात संभ्रम आणि संशयाचे वातावरण आहे. कुठल्याही चिन्हावर मतदान केले ते ते फक्त भारतीय जनता पक्षाला  जाते असे देखील अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे ही लोकशाही आहे की, हिटलरशाही आहे असा सवाल देशभरात  विचारला जात आहे. पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे अशी मागणी देश करीत आहे पण त्यांच्या मागणीला कवडीची किंमत  दिली जात नाही. निवडणुका होतात आणि  भारतीय जनता पक्ष निवडून येत आहे. प्रत्यक्षात देशातील  नागरिक मोदी सरकारच्या विरोधात आहे  आणि प्रचंड नाराजी जनतेत आहे. तरी देखील  निवडणूक निकाल असे कसे येतात याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. विविध पक्ष मागणी करीत असतानाही मतदान यंत्राऐवजी मत पत्रिकेवर मतदान घेण्यास केंद्र सरकार का अनुकूल नसावे ? असा प्रश्न विचारला जात आहे.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असणे हे लोकशाही साठी आवश्यक  असले तरी प्रत्यक्षात मोदी सरकार यापासून दूर का पळत आहे ? असा सवाल विचारला जात आहे . आता तर ग्राम पंचायत  देखील असे ठराव करून मागणी  करू लागले आहे. 


सांगोला तालुक्यातील महुद ग्रामपंचायतीने असा एक ठराव केला आहे आणि  येणारी निवडणूक ही मतदान यंत्राऐवजी मतपत्रिका वापरून घेण्यात यावी अशी मागणी केली आहे .     देशातील सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात, अशी मागणी करणारा ठराव महूद (ता. सांगोला) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये करण्यात आला आहे. महूद ग्रामपंचायत ग्रामसभा आज घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच संजीवनी लुबाळ होत्या. (Do not vote on voting machines) मतदान प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पडणाऱ्या ईव्हीएम मशिनबाबत देशभरामध्ये सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे देशातील सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतदान पत्रिकेवरती घेण्यात याव्यात, अशी मागणी करणारा ठराव दीपक धोकटे यांनी मांडला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव सरतापे यांनी अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये मतदान मतपत्रिकेद्वारे घेतले जात असताना भारतातच ईव्हीएमचा आग्रह का धरला जात आहे, असे मत व्यक्त करत मतपत्रिकेचा आग्रह करणाऱ्या मागणीला अनुमोदन दिले.


राज्यातील आणि देशातील नागरिकांची हीच मागणी असून, प्रत्येक ग्राम पंचायातीतून अशी  मागणी पुढे आली तर भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे. देशातील नागरिकांच्या मतांचा  आदर राखणे हे लोकशाहीला तारक आहे पण प्रयाक्षात काय घडतेय हे जनता उघड्या डोळ्यांनी  पाहत आहे . सोलापूर जिल्ह्यातून सुरु झालेल्या या  मागणीला अन्य ग्राम पंचायत कसा प्रतिसाद देतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !