BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ जाने, २०२४

शरद पवारांचा एकच प्रश्न आणि गर्दीने केला सलाम !





शोध  न्यूज : सभेत बोलण्यासाठी शरद पवार उभे राहिले आणि गर्दीतून घोषणेचा एका आवाज येताच, शरद पवारांनी एकच प्रश्न विचारला आणि सभेची गर्दी अवाक झाली, सभेस जमलेल्या प्रत्यकाने पवारांना अक्षरश: सलाम केला आणि याची चर्चाही राज्यभर होऊ लागली आहे.


राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे वय होऊनही त्यांचा उत्साह आणि क्षमता अफाट आहे हे त्यांच्या रोजच्या धावपळीवरून देश पहात आहे. ते अजूनही स्वत:ला वयोवृद्ध मानत नाहीत आणि तरुणाईला लाजवेल असे काम देखील ते करीत असतात. या वयात देखील ते राजकीय संकटे झेलत असतात आणि त्यातून खंबीर उभे राहून मार्ग काढतात. एवढेच नव्हे तर प्रत्येक खेळात बाजी तेच जिंकत आलेले आहेत. आजचा तरुण वर्ग देखील त्यांच्या मागे उभा आहे पण या तरुणाईला त्यांच्या विविध वैशिष्ट्याची अजूनही कल्पना नाही, याचीच झलक शरद पवार यांच्या जुन्नर तालुक्यातील एका जाहीर सभेत आली आहे. वास्तविक शरद पवार यांचे हे वैशिष्ठ्य महाराष्ट्राने यापूर्वी आणि वारंवार पाहिलेले आहे. शरद पवार यांनी राजकीय जीवनास सुरुवात केल्यापासून त्यांनी अवघा महाराष्ट्र पायाखाली घातला आहे आणि त्यांना राज्यातील खेडी देखील परिचित आहेत.


शरद पवार जेथे जातील तेथे त्यांना काही लोक भेटायला येतात. आलेल्या लोकांची ते ओळख तर ठेवतातच, पण त्यांची नावे देखील त्यांच्या लक्षात राहिलेली असतात. अनेक सभामधून बोलताना, त्या त्या गावातील जुन्या लोकांची आठवण ते काढत असतात. जाहीर सभेत बोलताना त्या गावातील जुन्या लोकांची नावे देखील ते घेत असतात. एवढी नाळ त्यांनी खेडोपाडी जोडलेली आहे. पण जुन्नर तालुक्यातील एका प्रसंगाने सभेस जमलेल्या गर्दीला अवाक केल्याचे दिसून आले. वय झाले की स्मरणशक्ती कमी होते पण पवारांच्या बाबतीत असे काही घडलेले नाही याचा प्रत्यय या सभेत आला. जुन्नर तालुक्यातील या सभेत शरद पवार बोलायला उठले आणि सभेत पवार यांचा जयजयकार करणाऱ्या घोषणा सुरु झाल्या. या घोषणा शरद पवार यांच्या कानावर पडल्या. त्याचवेळी या घोषणेतील एक आवाज त्यांचे लक्ष वेधून गेला.


सभेतील गर्दीतून दिल्या जाणाऱ्या घोषणातून अनेक आवाज उमटत होते पण शरद पवार यांनी व्यासपीठावरून गर्दीतील त्या एका आवाजाच्या दिशेने कटाक्ष टाकला. काही क्षण पुढे पहात गर्दीकडे बोट दाखवत ते म्हणाले, 'कोंडाजी वाघ  का ?  त्यांना उत्तर मिळाले नाही त्यामुळे त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या पदाधिकाऱ्याला पुन्हा विचारले, 'हे कोंडाजी वाघच आहेत का ? याचवेळी गर्दीतून उत्तर आले, 'होय, हे कोंडाजी वाघच आहेत" त्यानंतर मात्र गर्दीने टाळ्यांचा प्रचंड कडकडात केला आणि शरद पवार यांच्या स्मरणशक्तीला सलाम केला.  एवढ्या मोठ्या गर्दीतील एक जुना आवाज शरद पवार यांनी ओळखला होता. (The crowd saluted Sharad Pawar) पवार यांनी या वयात देखील आणि गर्दीतून आलेला आवाज कुणाचा आहे, हे ओळखून जाहीरपणे त्यांनी व्यासपीठावरून याचा उल्लेख केला. येथे कोणतीही सभा असली तरी कोंडाजी वाघ घोषणा देत असतात. असे देखील शरद पवार यांनी सांगितले.


शरद पवार यांनी कोंडाजी वाघ यांचा उल्लेख केल्याने सगळ्या गर्दीचे लक्ष कोंडाजी यांच्याकडे केंद्रित झाले. सभा संपली तेंव्हा या गर्दीतील अनेक लोकांनी कोंडाजी यांना गाठले. जुन्नर तालुक्यातील आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावाचे हे कोंडाजी रामजी वाघ हे लोकांच्या दृष्टीने वेगळे आकर्षण ठरले होते. शरद पवार यांनी त्यांची ओळख ठेवली असल्याची बाब मात्र कोंडाजी यांनी सहजपणे घेतली. शरद पवार  मंत्री असताना शरद पवारांना अनेकदा मुंबईला जाऊन भेटलोय.. त्यांच्या सभा मी ऐकतो असे त्यांनी सांगितल्यानंतर शरद पवार हे आमच्या जिवाचे नेते आहेत, शेतकऱ्यांचे जिवाचे नेते आहेत असे सांगितले. शरद पवार यांचे असे अनेक किस्से राज्यात चर्चिले जात असतात. अलीकडेच ते दौंड तालुक्यातील एका सभेसाठी गेले असता, सभेतील गर्दीत असलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवत, दूर अंतरावर असलेल्या त्या व्यक्तीला बोलावून घेण्यास सांगितले होते. ती व्यक्ती जवळ आली तेंव्हा त्याला, "तू भिवा शेलार का रे ?" असा प्रश्न विचारला होता. शेलार यांना मोठ्या गर्दीत देखील त्यांनी ओळखले होते, केवळ ओळखलेच नाही तर त्याचे नाव देखील सांगितले होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !