BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ जाने, २०२४

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थाना बाहेर घातपात घडविण्याबाबत आला फोन , सुरक्षा यंत्रणा अलर्ट !


शोध न्यूज : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रहात असलेल्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर मोठा घातपात करण्याबाबत एक मोठी माहिती समोर आली असून, यामुळे पोलीस दल अलर्ट झाले आहे. 


गेल्या दोन वर्षात शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अधिकच आक्रमक झाले आहेत. राज्यातील राजकीय परिस्थिती ही स्फोटक बनलेली आहे. भारतीय जनता पक्षाने ठाकरे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न अखंड सुरु ठेवलेले आहेत. राजकीय कुरघोड्या एकमेकावर केल्या जात असताना आणि परस्परावर अत्यंत टोकाची टीका केली जात असल्यामुळे राजकीय वातावरण स्फोटक आहेच, त्यातच आता ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर मोठा घातपात होणार असल्याबाबत एक माहिती समोर आली असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर मोठा घातपात होणार असल्याबाबत एक फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आलेला आहे. घातपात घडविण्याबाबतचा हा फोन आल्यानंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. 


मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सुस्पष्ट माहिती दिली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई - गुजरात रेल्वेने प्रवास करीत असलेल्या चार पाच व्यक्तींचे संभाषण ऐकून आपण ही माहिती देत असल्याचे त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले आहे. घातपाताचे संभाषण करणाऱ्या या व्यक्ती मुस्लीम होत्या आणि ते उर्दू भाषेत घातपाताबाबत बोलत होते.अशी माहिती या व्यक्तीने पोलिसांना दिली आहे. या व्यक्ती मोहम्मद आली रोडवर भाड्याने एक खोली घेणार आहेत असे देखील त्यांच्या संभाषणातून समोर आले असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. ही माहिती मिळताच पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. या प्रकाराने शिवसैनिक देखील चिंतेत असल्याचे दिसत आहे.


अलीकडेच माजी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली  होती आणि याचे मोठे पडसाद राज्यात उमटले होते. मातोश्री निवासाच्या मागच्या आणि पुढच्या अशा दोन्ही गेटवर पोलिस बंदोबस्त असायचा पण तेथील सुरक्षेत देखील राज्य शासनाने कपात केली. (Uddhav Thackeray's Matoshree Niwas target) शासनाच्या या निर्णयाचा संताप शिवसैनिकांनी व्यक्त केला होता तसेच राज्यात देखील याची चर्चा झाली होती. आता मात्र मातोश्री च्या बाहेरच हा घातपात घडविण्याबाबतचा प्रकार समोर आला आहे. साहजिकच शिवासैनिकातून चिंता व्यक्त होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !