BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ जाने, २०२४

उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे... PM मोंदीच्या मंचावर भाषणात सोलापूरच्या आमदाराचा गोंधळ !



शोध न्यूज : राज्याच्या राजकारणात सत्ता संघर्ष टोकाला पोहोचला आहे पण उद्धव ठाकरे हे सगळ्यांच्याच मनात घर करून बसले असल्याचे दिसत आहे, सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत माजी आमदारांनी उद्धव ठाकरे यांचा उप मुख्यमंत्री असा उल्लेख केला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कारकीर्द अत्यंत समाधानकारक गेल्याचे सगळेच सांगत असतात. कोरोना काळात तर त्यांनी केलेले काम हे अजरामर झाले असून देशात या कामाचा गौरव झाला आहे. त्यांनी कधी थाळ्या वाजवायला सांगितले नाही की टाळ्या वाजवायला सांगितले नाही. स्वत: आजारी असताना देखील त्यांनी  महाराष्ट्राची काळजी घेतली आणि महाराष्ट्र कोरोना सारख्या महामारीच्या कचाट्यातून वाचवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरे यांच्यासारखा असावा असे सगळ्यांनाच वाटत राहिले आहे. यात  गद्दार समर्थकांचा समावेश असणार नाही पण सामान्य जनतेला काय वाटते हे सोशल मीडियावरून सतत पाहायला मिळत आहे. अजूनही लोकांच्या मनात उद्धव ठाकरे हेच अढळ स्थान निर्माण करून आहेत पण राजकारणातील लोक देखील उद्धव ठाकरे यांच्या नावाला विसरू शकत नाहीत हेच आज दिसून आले आहे. सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला यातूनच सगळे काही समोर आले. 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुर दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कामगार, कष्टकरी जनतेचे घरकुलाचे स्वप्न साकार होत आहे. आज हजारो कामगार ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री, जिल्ह्यातील खासदार, आमदार, मंत्रीगण उपस्थित आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार नरसय्या आडम यांच्या भाषणाने झाली.

मात्र, आडम यांच्या भाषणाला सुरवात केली तेंव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या. आडम हे भाषणासाठी उभे राहिले तेंव्हा त्यांनी   भाषणात उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. त्यानंतर मात्र त्यांना आपली चूक लक्षात आली आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी आपली चूकदुरुस्त केली. आडम यांनी देवेंद्र फडणवीस यांची मंचावरुनच माफी देखील मागितली. (Uddhav Thackeray Deputy Chief Minister) व्यासपीठावर असलेल्या उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दखल घेतली गेली नाही पण उपस्थित नसलेल्या उद्धव ठाकरे यांचे नाव मात्र त्यांनी घेतले. यावरून उद्धव ठाकरे हे नाव किती मनामनात बिंबले आहे याचीच प्रचीती या कार्यक्रमात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !