BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जाने, २०२४

महाराष्ट्रातील 'या' सरपंचाना मिळाले आयोध्येचे निमंत्रण !

 


शोध न्यूज : अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण देण्यावरून राज्यात बरेच राजकारण झालेले असताना, महाराष्ट्रातील एका सरपंचाना मात्र या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.


अयोध्या येथे प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे, या मंदिर उभारणीची चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे आणि अखेर आता या मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. येत्या २२ जानेवारीला हा सोहळा होत असून, देशातील राम भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तथापि अयोध्याचा राम मंदिराचे राजकारण पहिल्यापासूनच भारतीय जनता पक्षाने केले असल्याचा आरोप तर होत आलेलाच आहे पण, आता या सोहळ्याला देखील राजकीय स्वरूप प्राप्त झाले असल्याचे आरोप रोज होताना दिसत आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या आधी राम मंदिराचा मुद्दा आजवर चर्चेला आला आहे आणि आता पुन्हा तो अत्यंत प्रभावाने समोर आलेला आहे.  या राम मंदिराचं संपूर्ण बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही, असे असतांना या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यास अनेकांनी विरोध केला आहे.  राम मंदिराचे बांधकाम अजूनही अर्धवट आहे आणि ते पूर्ण होण्यास आणखी तीन वर्षे लागणार आहेत परंतु निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा उठवण्यासाठी अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई भाजपाला झाली असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.


अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमाला राजकीय स्वरूप मिळत असल्याने देशभरातून नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे हा आनंदाचा सोहळा साजरा होत असताना, दुसरीकडे केवळ राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होत आहे. बाबरी मशीद पाडली गेली तेंव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याची जबाबदारी घेत, त्या शिवसैनिकांचे कौतुक केले होते. आज श्रेय घेणारे त्यावेळी पळून गेले होते असे आरोप देखील होत असतात. असे असतानाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना, या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात झालेले राजकारण महाराष्ट्राला आजिबात आवडलेले नाही. उद्धव ठाकरे हे या सोहळ्याला जाणारही नाहीत.  देशातील अनेक राजकीय पक्षांनी, हा राजकीय सोहळा बनल्यामुळे या कार्यक्रमास जाणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या सोहळ्याला राजकारणाची किनार मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर हा सोहळा साजरा होणार आहे. महाराष्ट्रातील एका सरपंचाना मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे.


 अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेपना सोहळ्याचे निमंत्रण देशभरात देण्यात आले असून, अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अशातच महाराष्ट्रातील हिवरे बाजार गावाचे सरपंच पोपट पवार (Popat Pawar) यांना प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रात समाधान व्यक्त होत असून, त्यांच्या सोबतच आण्णा हजारे यांना देखील या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. (Invitation to Sarpanchana Ayodhya in Maharashtra) पोपट पवार हे नावाजलेले सरपंच असून, त्यांनी त्यांच्या गावात केलेल्या क्रांतीमय कामामुळे देशाच्या बाहेर त्यांचे नाव गेले आहे. गावाचे सहकार्य घेत त्यांनी गावाचा कायापालट केला आहे. १९८९ मध्ये ते सरपंच झाले आणि त्यांनी हिवरे बाजार या गावात असलेली पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर केली, विविध योजना राबवल्या आणि गाव स्वयंपूर्ण केले त्यामुळे जगभरात त्यांचे कौतुक झाले. आता त्यांना अयोध्येचे निमंत्रण प्राप्त झाले आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !