BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जाने, २०२४

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाबाबत मोठी अपडेट !

 



शोध न्यूज : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या मुंबई आंदोलनाला मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या विरोधात तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात नकार देत याचिकाकर्त्याला फटकारले देखील आहे.


मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यापासून आंदोलन सुरु ठेवले आहे आणि त्या आंदोलनास राज्यभरातून मोठा पाठींबा मिळत आहे. शासनाने त्यांना आश्वासने देत सतत फसवणूक केली असल्यामुळे मराठा बांधव संतापला आहे तर जरांगे पाटील यांनी मुंबईला कूच करण्याचा पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे अनेकांना धसका बसला असून, अनेक विद्यमान लोकप्रतिनिधी भविष्यात अडचणीत येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून शासनात देखील खळबळ उडाली आहे. अनेकजण या आंदोलनाच्या विरोधात हालचाली करीत असताना, माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनास परवानगी देण्यात येवू नये असे या याचिकेत म्हटले आहे.


मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मुंबई आंदोलनाचा अनेकांनी धसका घेतलेला असून, त्यांच्या या आंदोलनाला खोडा घालण्याचा प्रयत्न काहीजण करीत आहेत पण जरांगे पाटील कुणालाही भीक घालताना दिसत नाहीत, त्यातच एक मार्ग म्हणून हेमंत पाटील यांनी त्यांच्या  मुंबई आंदोलनाच्या विरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय काय होतोय आणि मुंबई आंदोलनाचे काय होतेय याकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते. मात्र मनोज जरांगे पाटील यांना मोठा दिलासा लाभला आहे. सदर याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. (A big update on Manoj Jarange Patil's Mumbai agitation) लाखो कार्यकर्त्यांना मुंबईत आणून कायदा सुव्यवस्था बिघडविण्याची धमकी दिली जात आहे असा आरोप करीत त्यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी करणारी ही याचिका हेमंत पाटील यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार तर दिलाच पण शेलक्या भाषेत याचिकाकर्त्यांना सुनावले देखील आहे.


आम्ही मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलन करण्यापासून कसे अडविणार? हे आमचे काम नाही. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राखणे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही बसलेलो नाहीत, यापेक्षा बरीच महत्त्वाची कामे आमच्याकडे आहेत, अशा शब्दांत याचिकाकर्ते हेमंत पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानसह, बीकेसी आणि शिवाजी पार्क अशा त ठिकाणी आंदोलनासाठी मुंबई पोलीसंच्याकडे परवानगी मागितली आहे. मनोज जरांगे 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणार आहेत. तर 22 जानेवारी रोजी ते मुंबईत दाखल होतील. जरांगे पाटील यांनी मात्र, आंदोलन अत्यंत शांततेत करण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. हिंसा करणारा आपला असणार नाही आणि कुणी हिंसा करू लागले तर त्याला पकडून पोलिसांच्या हवाली करावे अशा सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा पुनरुच्चार देखील त्यांनी केला आहे.


  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !