BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जाने, २०२४

अ‍ॅम्ब्युलन्स खड्ड्यात गेली अन् धक्क्याने जिवंत झाली 'मृत' व्यक्ती !




प्रतिशोध न्यूज : अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेवून निघालेली  अ‍ॅम्ब्युलन्स खड्ड्यात गेली अन् धक्क्याने मृत व्यक्ती जिवंत झाली असल्याचा एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. या घटनेची मोठी चर्चा देखील सुरु झाली आहे.


रत्यावर असलेले खड्डे हे माणसांच्या मृत्यूचे मोठे कारण ठरतात. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात आणि या अपघातात माणसांचे बळी जात असतात. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी सातत्याने होत असते. अशा खड्ड्यांसाठी विविध प्रकारची आंदोलने देखील करण्यात येत असतात. भारतातील रस्ते हे नेहमीच खड्ड्यात हरवलेले पहायला मिळतात. माणसांचे जीव घेणारे खड्डे काही माणसाला जीवदान देतील काय ? विचित्र वाटणारा हा प्रश्न असला तरी, चक्क एका खड्ड्यामुळे मृत झालेल्या एका व्यक्तीला नवे जीवन देणारा ठरला असून, चक्क एका खड्ड्यामुळे, मृत्यू झालेल्या एका व्यक्तीला पुन्हा जिवंत होता आले आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर डॉक्टर हृदयावर दाब देत रुग्णाचा प्राण वाचवतात. रस्त्यावर देखील अनेकांनी असे प्राण वाचवले आहेत हे आपण पाहिलेले आहे. असाच काहीसा प्रकार एका वृध्द व्यक्तीबाबत घडला आहे.


एका खड्ड्यामुळे मृत व्यक्ती जिवंत झाली असल्याचा दावा, मृत व्यक्तीच्या कुटुंबाने केला आहे. एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीने दिलेल्या वृतानुसार दर्शनसिंग ब्रार या ८० वर्षे वयाच्या वृद्धास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचार घेत असताना, सदर रुग्णाचा मृत्यू झाला आणि डॉक्टरांनी देखील त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे ब्रार यांचे कुटुंबीय त्यांचा मृतदेह घेऊन पतीयाळा येथून कर्नालजवळील निसिंग येथील त्यांच्या घरी घेऊन जात होते. येथे त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात येणार होते. अंत्यसंस्काराची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली  होती. मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचे टायर अचानक रस्त्यावरील खड्ड्यात गेलं आणि जोराचा धक्का बसला. त्यानंतर पुढील अविश्वसनीय घटना समोर आली.


रुग्णवाहिका खड्ड्यातून गेल्यानंतर दर्शन ब्रार यांच्या मृतदेहाजवळ असलेल्या नातवाला काही वेगळेच दिसले. मृतदेहाचे हात हलताना त्याने पाहिले. मृत्यू झालेले दर्शन सिंग चक्क आपले हात हलवत होते. नातवाने अधिक बारकाईने पहिले असता, त्यांच्या हृदयाचे ठोके देखील त्याला जाणवले. त्याने लगेच रुग्णवाहिकेच्या चालकाला, रुग्णवाहिका रुग्णालयात घेण्यास सांगितले. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता, ते जिवंत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा प्रकार पाहून डॉक्टर देखील चकित झाले आणि त्यांनी, या रुग्णाला कर्नाल येथील रुग्णालयात पाठवले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती सुधारताना दिसत आहे. कुटुंबीयाला तर हा सगळा प्रकार म्हणजे केवळ एक चमत्कार वाटू लागला आहे.


रस्त्यावरील एक खड्डा देखील माणसांच्या जीवावर बेततो पण येथे मात्र खड्ड्याने वेगळाच चमत्कार केला आहे. रुग्णवाहिका खड्ड्यात जाताच मृत व्यक्तीला जोराचा धक्का बसला आणि मृत झालेली व्यक्ती चक्क जिवंत झाली. एवढेच नव्हे तर, त्याची प्रकृती देखील सुधारत आहे. ((A 'dead' person came alive with shock)) अंत्यसंस्कार करण्याची पूर्ण तयारी झाली होती आणि रुग्णवाहिका मृतदेह घेवून तिकडे निघालेली असताना, मृत व्यक्तीला एका खड्ड्याने जीवन दान दिले आहे. या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरु झाली आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !