BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ जाने, २०२४

सायरन वाजला आणि मोठा डाव उधळला !

 


शोध न्यूज : चोर तयारीने आले पण ऐनवेळी सायरन वाजला आणि गोंधळलेल्या चोरांना अखेर पळ काढावा लागल्याची मोठी घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. सायरन वाजल्यामुळे चोरांचा मोठा डाव उधळला गेला आहे.


ग्राहकांच्या सुविधेसाठी बँकेकडून एटीम मशीन उपलब्ध करण्यात आले आहेत आणि याचा मोठा फायदा ग्राहकांना होत असतो, गरजेच्या वेळी बँकेत न जाता पैसे उपलब्ध होत असतात पण चोरट्यांना मात्र ही आयातीच संधी मिळू लागली आहे, राज्यभरात एटीम मशीनमधील रकमेची चोरी होताना दिसत  आहे. कधी  हे मशीन फोडून तर कधी अख्खे मशीनच पळवून नेऊन मोठ्या रकमेची चोरी केली जाते. सीसीटीव्हीची सुविधा असली तरी त्यावर स्प्रे फवारून आणि कधी कधी ते फोडून टाकून चोरी केली जाते, बँकेकडून सर्व खबरदारी घेण्यात येत असली तरी एटीम मशीन  फोडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मशीनमधून जागेवर पैसे चोरता आले नाहीत तरी देखील अख्खी मशीन  पळवण्याच्या अनेक घटना  घडल्या आहेत. आता हा प्रकार सोलापूर जिल्ह्यात देखील घडला असून, चोरांचा डाव मात्र एका सायरनमुळे उधळला गेला आहे. एटीम मशीन फोडून मोठ्या रकमेवर डल्ला मारायचे नियोजन करून चोरटे आले पण  त्यांना तेथून तरी रिकाम्या  हाताने पळून जावे लागले आहे.


महाराष्ट्र बँकेचे एटीम फोडण्याचा डाव चोरट्यांनी  केला होता. नियोजन करून चोरटे आले आणि बँकेचे एटीम फोडण्याचा प्रयत्न करू लागले. त्याचवेळी अचानक सायरन वाजू लागला. सायरनचा आवाज आल्याने चोरांची तारांबळ उडाली  आणि आता आपण पकडले जाऊ शकतो याची  जाणीव त्यांना झाली . काही करून तेथून पळ काढण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे त्यांनी लगेच तेथून पळ काढला. (Attempt to break ATM machine failed) सायरन वाजल्यामुळे मोठ्या चोरीची घटना टळली असून चोरट्यांना मात्र तेथून रित्या हाताने परतावे लागले  आहे. या आधीही चोरट्यांनी एटीम मह्सीन फोडण्याचा प्रयत्न केला होता पण हा प्रयत्न असफल झाला होता आणि  आता तिसऱ्या वेळी देखील चोरट्यांना अपयश आले आहे. दरम्यान महूद येथील दुकानात मात्र चोरांनी आपला हात साफ केला आहे. स्वीट मार्ट आणि मोटार रिवायडिंगच्या दुकानात प्रवेश करून चोरांनी जवळपास पावणे दोन लाखांची चोरी मात्र केली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !