BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ जाने, २०२४

शरद पवार गटाला आणखी एक धक्का ! एका आमदाराने घेतला अजित पवारांचा झेंडा !


शोध न्यूज : राष्ट्रवादी पक्ष कुणाचा याबाबत एकीकडे सुनावणी सुरु झाली असतानाच, दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाला आणखी एक धक्का बसला असून, शरद पवार गटाच्या आणखी एका आमदाराने अजित पवार यांचा ढोल वाजवला आहे.


शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्षात देखील  फुट पडली आणि ज्या पक्षाने सगळे काही दिले त्याच पक्षाला आणि शरद पवार यांना सोडून काही आमदार भाजपाशी हातमिळवणी करून सत्तेत जाऊन  बसले. यात शरद पवार यांचे पुतणे असलेले अजित पवार यांचा देखील समावेश आहे. शरद पवार यांना वृद्धावस्थेत असे एकाकी पाडल्याने महाराष्ट्र हळहळला आहे. तिकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्यातून मोठी  सहानुभूती मिळत असतानाच इकडे शरद पवार यांना देखील तशीच सहानुभूती मिळत असून, राष्ट्रवादी पक्ष कुणाचा ? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी सुरु केली आहे. याचा निकाल देखील शिवसेनेसारखाच येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Another blow to Sharad Pawar group) दरम्यान पक्षात फुट पडूनही शरद पवार हे खचले नसून नव्या जोमाने पक्ष उभारणी करू लागले आहेत. अशाच परिस्थितीत त्यांचा आणखी एक आमदार अजित पवार यांच्या गटात गेला आहे. 


जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी पक्षातील फुटीवेळी तटस्थ भूमिका घेतली होती. आता मात्र त्यांनी अजित पवार यांच्या गटाला पाठींबा दिला असून यामुळे शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसला आहे. आपण अजित पवार यांच्याच सोबत असून जुन्नर मतदार संघात अजित पवार यांच्या गटाचाच झेंडा डौलाने फडकावणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. अजित पवार हे कामाचा आणि प्रश्न सोडविणारा माणूस आहे. राज्यात अनेक युती आणि आघाडी होतात. कांदा निर्यातबंदी शेतकरी विरोधात निर्णय झाला. शेतकऱ्यांना धिर द्यायचे काम अजित पवार करतील. अतुल बेनके यांची साथ मिळाल्याने जुन्नरमध्ये अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे. याचा फायदा अजित पवार गटाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होणार का? आणि झालाच तर तो कितपत होईल हे येणारा काळच सांगणार आहे, सद्या मात्र हा शरद पवार आणि त्यांच्या गटाला एक धक्का मानला जात आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !