BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ डिसें, २०२३

मराठा कार्यकर्ते बनून जरांगे पाटील यांच्या ताफ्यात दुसरीच टोळी !

 


शोध न्यूज : मराठा योद्ध मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातून चोरट्यांची एक टोळी फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 


चोरी करण्यासाठी चोर वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतो हे सर्वांनाच माहित आहे पण चोरांच्या एका टोळीने वेगळाच फंडा वापरला आणि चोरी करण्यात ते यशस्वीही झाले.  मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा (Maratha arakshan) ध्यास घेतला असून, राज्यभर ते सभा घेत आहेत. त्यांच्या सभेला विक्रमी गर्दी होत आहे आणि या गर्दीचीही चर्चा सुरु आहे. काही मोठे विक्रम देखील त्यांच्या सभेने मोडलेले आहेत.  जेथे गर्दी तेथे मोबाईल चोर, खिसेकापू, महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारे आपोआपच येत असतात. जरांगे पाटील यांच्या एकाच सभेत, वेगवेगळ्या प्रकारे एक कोटी रुपयांची चोरी झाल्याची तक्रारही पोलिसात दाखल झाली आहे. या चोरीने खळबळ उडवून दिलेली असतानाच आता एक नवा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे चिंता देखील व्यक्त होऊ लागली आहे.


मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मोठी गर्दी होऊ लागल्याचे पाहून, चोरांच्या एका टोळीने नवा फंडा अमलात आणला. हे चोर गर्दीत घुसण्याआधी जरांगे पाटील यांच्या ताफ्यात घुसत होते. मराठा आंदोलक असल्याचा आभास निर्माण करीत ते जरांगे पाटील यांच्या ताफ्यात बेमालूमपणे घुसत होते. (Gang of thieves in Manoj Jarange Patil's convoy) मराठा समाजाचे कार्यकर्ते म्हणून पांढरे कपडे घालून मनोज जरांगे पाटील यांच्या कॅनवामध्ये चोर घुसायचे. आणि कार्यकर्ते असल्याचा भास निर्माण करून सभेत बिनधास्त चोऱ्या करायचे. अखेर पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले असून त्यांच्याकडून चारचाकीसह, १ लाख ८० हजारांची रोख, ८ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. 


मराठा कार्यकर्ते असल्याचे भासवत ते सभेतून मुक्तपणे फिरत होते आणि दागिने तसेच पाकीट आणि  मोबाईल यांची चोरी करीत होते.  मराठा आंदोलकांच्या वेषात ते वावरत असल्यामुळे कुणाला त्यांचा संशयही येत नव्हता त्यामुळे त्यांच्या चोरीचे प्रकार खपून जात होते. विशेष म्हणजे ही पाच जणांची टोळी आपले चार चाकी वाहन घेवून जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या वाहनाच्या ताफ्यात प्रवेश करीत होते. जळगाव पोलिसांनी मात्र मालेगाव येथील या पाच जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांच्याकडून एक लाख ८० हजार रुपयांची रोकड, आठ मोबाईल आणि एक चार चाकी गाडी हस्तगत केली आहे.  या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटले असून, काहींनी याबाबत चिंताही व्यक्त केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !