BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ डिसें, २०२३

मंत्री छगन भुजबळ मोठ्या अडचणीत !

 


शोध न्यूज : मराठा आरक्षणाला विरोध करणारे राज्याचे मंत्री छगन भुजबळ सद्या रोज चर्चेत असताना, आता त्यांच्यासमोरील अडचणीत मोठ्या प्रमणात वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एका प्रकरणात तिघांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार असल्याची मागणी केली आहे.


राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे काही काळ तुरुंगात राहून आले आहेत, त्यांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्या मागचे हे शुक्लकाष्ठ संपलेले नाही. महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा मोठा आरोप त्यांच्यावर आहे आणि हा खटला विशेष पीएमएलए न्यायालयात अजूनही सुरु आहे. छगन भुजबळ यांच्यासह अन्य काहीजण या घोटाळा प्रकरणात आरोपी आहेत. परंतु आता या प्रकरणालाच वेगळे वळण मिळाले आहे आणि त्यामुळे भुजबळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून दोषमुक्त करण्यात यावे असा अर्ज छगन भुजबळ यांनी न्यायालयाकडे केला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील अन्य तीन आरोपींनी मात्र, माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. यावर २० डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी या अर्जावर उत्तर देण्याचे आदेश विशेष पीएमएलए न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालय अर्थत ई डी ला दिले आहेत. त्यामुळे अचानक या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, छगन भुजबळ यांची कोंडी झाली आहे.


महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा आणि अन्य गैर व्यवहार याबाबत २०१६ सालीच हा गुन्हा दाखल झाला आहे. ८५० कोटी रुपयांच्या या घोटाळयाप्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह ५२ जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणातून भुजबळ यांच्यासह अन्य आरोपींची, मुंबई सत्र न्यायालयाने मुक्तता केली असली तरी विशेष पीएमएलए न्यायालयात मात्र सुनावणी सुरूच आहे.(Minister Chhagan Bhujbal in big trouble) या दरम्यान सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज या तीन आरोपींनी मात्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात माफीचे साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे.  विशेष म्हनाजे, भुजबळ यांच्यासह अन्य आरोपींना सदर प्रकरणातून मुक्त करण्यात यावे अशी याचिका दाखल करण्यात आली आहे, या याचिकेवर सद्या सुनावणीही सुरु आहे. परंतु ही सुनावणी थांबविण्यात यावी आणि माफीचा साक्षीदार होण्याच्या अर्जावर आधी न्यायालयाने निर्णय द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !