BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ डिसें, २०२३

विहिरीत पडून महिला सरपंचांचा दुर्दैवी मृत्यू !




शोध न्यूज :गावाचा कारभार हाकणाऱ्या महिला सरपंचांचा विहिरीत पडून, बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून, या घटनेने गाव सुन्न झाले आहे तर परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.


पाण्यासाठी विहिरीत उतरलेल्या अनेकांचा, विशेषत: महिलांचा मृत्यू होण्याची ही काही पहिली घटना नाही. विहिरीत उतरताना पाय घसरून पाण्यात पडून अशा घटना अधूनमधून होत असतात. महिलांनी विहिरीत उतरणे धोक्याचे मानले जात असले तरी देखील त्यांना पाण्यासाठी असा धोका पत्करावा लागलो. आणि काही प्रसंगी अप्रिय घटना घडल्याचे समोर येते. असाच प्रकार शिरूर तालुक्यातील नागरगाव येथील ग्रामपंचायत सरपंच मंगल शेलार यांच्याबाबत घडला आहे. जनावरांची तहान भागविण्यासाठी सरपंच मंगल शरद शेलार या विहिरीवर गेल्या होत्या. यावेळी पाणी काढताना त्यांचा पाय घसरला आणि त्या पाण्यात पडल्या. याचवेळी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, ४२ वर्षे वयाच्या महिला सरपंच मंगल शरद शेलार या आपल्या घराच्या मागच्या बाजूलाच असलेल्या विहिरीवर गेल्या होत्या. जनावरांना पाणी पाजण्यासाठी या विहिरीतून पाणी काढण्यासाठी त्या गेल्या. घरातून त्या मागच्या बाजूला गेल्या पण एक तासांपेक्षा अधिक वेळ होऊनही त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे घरातील मंडळीनी त्यांचा शोध सुरु केला. घरातील सदस्यांनी शेतात फिरून त्यांचा शोध घेतला पण त्या कुठेच दिसून आल्या नाहीत.  शेतात असलेल्या विहिरीकडेही त्यांनी शोधले पण त्यांचा कसलाच ठाव ठिकाणा लागला नाही. त्या सापडत नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली होती. कुठेच सापडत नसल्यामुळे, त्या विहिरीत पडल्या असाव्यात अशी शंकाही कुटुंबियांना आली आणि त्यांनी विहिरीतील पाणी उपसायला सुरुवात केली.


शेलार यांच्या शेतातील या विहिरीला बाजूला दगडी पायऱ्या असून, मोटारीने पाणी काढून ते हौदात सोडून जनावरांना दिले जाते. वीजपुरवठा खंडित असल्यावर विहिरीतील पायऱ्यांवर उतरून दोरीला बादली बांधून जनावरांसाठी पाणी काढले जाते. विहिरीत भरपूर पाणी असल्यामुळे कुटुंब आणि गावकरी मिळून या विहिरीत शोध घेत राहिले. (Death of female sarpanch after falling into a well) अखेर मोटारी लाऊन विहिरीतील पाणी बाहेर काढले. त्यानंतर त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या नंतर मात्र गावकरी निशब्द झाले तर कुटुंबाने आक्रोश केला.  या घटनेची माहिती शिरूर पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून, परिसरात देखील हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !