BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ नोव्हें, २०२३

माढा लोकसभा मतदारसंघात पडणार बंडाची ठिणगी !

 


शोध न्यूज : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या हालचाली सुरु  झाल्या असतानाच, उमेदवार देखील लंगोट लाऊ लागले आहेत, अशा परिस्थितीत माढा मतदारसंघात भाजपात बंड होण्याची चिन्हे दिसू लागली  आहेत.


लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदार संघ हा नेहमीच चर्चेत असतो, सोलापूर लोकसभेची जागा कॉंग्रेस लढविणार असल्याचे जवळपास अंतिम झाले आहे तसेच माढा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी लढवेल. सोलापूरसाठी प्रणिती शिंदे यांचे नाव अंतिम असल्याचे सांगितले जात असले तरी माढा मतदार संघातील नाव अजून राष्ट्रवादीने स्पष्ट केलेले नाही. माढा लोकसभेची जागा सद्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर अर्थात भारतीय जनता पक्षाकडे आहे. रणजीतसिंह नाईक निंबाळकर हेच येथून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहेत परंतु या जागेसाठी अकलूजच्या मोहिते पाटलांनी दंड थोपटले आहेत. माढा लोकसभा निवडणूक  लढविण्याची इच्छा भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांनी आधीही व्यक्त केली होती  पण आता त्यांनी दंड थोपटले असल्याचे दिसू लागले आहे.


भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघाची जागा आपण लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या जागेसाठी रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपात बंडखोरी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही जागा लढविण्याचे संकेत दिले आहेत पण पक्षाची भूमिका काय ? हे अजून समोर आले नाही. पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले आहेच. शिवाय आपण ही निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असून, ते आता ऐकण्याच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे उमेदवारी आपल्यालाच मिळावी , निवडणुकीची आपली तयारी असून मागील साडे तीन वर्षांपासून आपण ग्रामीण भागात काम करीत आहोत. त्यामुळे निवडणूक लढविणार असून पक्षाकडून उमेदवारी मिळवणार आहे. आपण निवडणूक लढविणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे या जागेवर जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. 


भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील आणि विद्यमान खासदार नाईक निंबाळकर यांच्यातील दुरावा आता सामान्यांना माहित झाला आहे. काही दिवसापासून या दोघांमध्ये राजकीय अंतर निर्माण झाले आहे हे काही लपून राहिले नाही. (The spark of rebellion in Madha Lok Sabha constituency!) त्यातच माढा लोकसभा निवडणुकीसाठी मोहिते पाटील यांनी दंड थोपटले आहेत त्यामुळे हा दुरावा आणखी वाढणार असून, राजकीय पेच देखील निर्माण होणार आहे. आता प्रत्यक्षात उमेदवारी कुणाला दिली जातेय, उमेदवारी नाही मिळाली तर प्रत्यक्षात बंड होईल काय ? या आगामी काही महिन्यातच दिसून येणार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !