जन्माला आलेली माणसं आपल्याच अवती भवती पाहत जगत राहतात आणि माझं माझं करीत मरतातही.... काही माणसं आपलं आयुष्य सेवाभावात घालवतात. पैसा तर सगळेच कमावतात आणि आपल्या ऐशारामावर उधळून देतात. पैसा सगळ्यांकडे असतो पण दातृत्व किती माणसांजवळ असतं ? या मोठ्या दुनियते काही मोजकीच माणसं इतरांसाठी झिजतात .....आपल्या आयुष्याचं सोनं करतात... होय, अशा मोजक्या माणसातील एक माणूस ... नव्हे देवमाणूस .... शिवाजीराव कोळी, कडबे गल्ली पंढरपूर.
मोकाट कुत्र्यांनाही जीव लावणारा पंढरीचा देवमाणूस ! भल्या सकाळी भटकी कुत्री त्यांची वाट पाहत उभी असतात ... त्यांना पाहिलं की खुश होतात आणि 'ते' कधी आलेच नाही तर हिरमुसतात ! पंढरीतील या देव माणसानं भटक्या कुत्र्यानाही असा लळा लावलाय... लोक पहातच राहतात आणि ------- !
भल्या सकाळी ते फिरायला जातात.... दुध डेअरीच्या परिसरात प्राणायाम करतात आणि तेथून ते क्वालेच चौकात येतात. फिरायला येणाऱ्या लोकांना आवर्जून चहा द्यायची त्यांची जुनीच सवय. पण आता याच ठिकाणी मोकाट कुत्री देखील त्यांची वाट पहात बसतात. एका दुकानातून बिस्किटांचे पुडे विकत घ्यायचे आणि उपाशी कुत्र्यांना खाऊ घालायचे... हा त्यांचा आता नित्यक्रम बनलेला आहे. सकाळी सकाळी अनेक भटकी कुत्री चौकात जमा होतात... शिवाजी कोळी येण्याच्या वाटेकडे पहात राहतात. ते येताना दिसले की आनंदून जातात. शिवाजी कोळी त्याना बिस्किटे खाऊ घालतात. कोळी कधी आलेच नाही तर कुत्री हिरमसून जातात पण दुसर्या दिवशी पुन्हा त्यांची वाट पहात उभी असतात. लोक देखील कौतुकाने हे पहातात. शिवाजी कोळी यांनी मोकाट कुत्र्यानाही जीव लावला आहे. अशी माणसं क्वचितच ... म्हणून तर त्यांची चर्चा सुरु आहे. कुत्रीही आता देवमाणूस म्हणून त्यांच्याकडे पाहू लागली आहेत. खरच, जे दुसऱ्यासाठी जगतात, देव त्यांच्यासाठी उभा राहतो. ग्रेट, शिवाजीराव ग्रेट !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !