शोध न्यूज : मराठा समाजास आरक्षण मिळणार नाहीच असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला असून तसे आपण मनोज जरांगे पाटील यांनाही सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तर आपला जीव डावावर लावलेला आहे. (Maratha arakshan) प्रखर उपोषण झाल्यानंतर शासन काहीसे नमले असल्याचे दिसत असले तरी देखील जरांगे पाटील यांनी पुन्हा एकादा महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. काही झाले तरी मराठा आरक्षण मिळवणारच असा निर्धार त्यांनी केला आहे. एकीकडे मराठा बांधव आरक्षणाची प्रतीक्षा करीत आहेत तर दुसरीकडे दुर्दैवाने मराठा तरुण आपले आयुष संपवतानाही दिसत आहेत. अनेक आत्महत्या झाल्याचे मोठे दु:ख घेवून मराठा समाज आरक्षण मिळण्यासाठी लढत आहे तर दुसरीकडे छगन भुजबळ यांच्यासारखे काही नेते करीत असलेल्या विधानांमुळे मराठा बांधवाना जखमा होत आहेत. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांनी मोठा दावा केला आहे.
ठाणे येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पोहोचले होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही आणि हे आपण मनोज ज्रांगे पाटील यांना सांगितले होते, तरीही ते आंदोलन करीत आहेत असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. याबरोबरच त्यांनी दुसरे एक विधान केले असून त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यताही दिसत आहे. जरांगे पाटील यांचा बोलावता धनी कोण आहे ? त्यांच्या पाठीमागे कोण आहे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि ते कालांतराने कळेल असेही त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे जातीपातीचे राजकारण करणारी अदृश्य शक्ती असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्यांनी कुणाचे नाव घेणे मात्र टाळलेले आहे.
मराठा आरक्षण मिळणार नाहीच असा पुनरुच्चार देखील राज ठाकरे यांनी केला आहे शिवाय २४ डिसेंबरच्या नंतर मुंबईत धडकणारे मनोज जरांगे हे काय सान्ताक्लोज आहेत काय ? असे देखील ते म्हणाले आहेत. (Raja Thackeray's statement on Maratha reservation) महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यापासून जातीपातीचे राजकरण सुरु झाले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. हे राजकारण महाराष्ट्राला खड्ड्यात घालत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे एक मुखाने मराठा समाज उभा असून, राज ठाकरे यांच्या आजच्या विधानाने मराठा समाजाला धक्का दिला आहे. राज ठाकरे अनेकदा तळ्यात मळ्यात असतात याची चर्चा नेहमीच होत असते पण आता त्यांनी जरांगे पाटील यांच्यावरच संशय व्यक्त केला आहे.
राज ठाकरे यांच्या विधानानंतर जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी परखड उत्तर दिले आहे. आमच्या आंदोलामांगे कुणाचा हात आहे हे आता राज ठाकरे यांनीच शोधून काढावे, या आधी सर्वांनी असा प्रयत्न केला आहे, आता राज ठाकरे यांनी लवकर शोध घेवून आम्हालाही सांगावे, कारण अजून आम्हालाच याचा शोध लागलेला नाही त्यामुळे आम्हालाही हे ऐकायचे आहे. असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला आहे. मराठा समाजातील मुलांचे भले व्हायला लागले की कुणीतरी अशा पुड्या सोडून देते, मराठा समाज आता अशा पुड्याना भीक घालणार नाही, मराठ्यांना आरक्षण मिळणारच आहे आणि आम्ही ते मिळवूच ! असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !