BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ नोव्हें, २०२३

बापाचाच काढला काटा आणि फेकून दिले घाटात !




शोध न्यूज : जन्म दिलेल्या बापाचा मुलानेच काटा काढला आणि घाटातील काटेरी झुडुपात मृतदेह फेकून दिल्याची एक धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात उघडकीस आली असून, या हत्येत कुटुंबातील अन्य सदस्यांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले  आहे.


अलीकडच्या काळात नात्यातली जवळीक संपत चालल्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात. सोलापूर जिल्ह्यात मात्र त्यापेक्षाही अधिक  करून आणि तितकीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या बापाने जन्म दिला, जोपासले, वाढवले आणि हवे ते हट्ट पुरवले त्याच बापाला, पोराने मारून टाकले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घाटातील निर्जन परिसरात नेऊन टाकला असल्याचे आता उघडकीस आले आहे. नात्याला हादरा देणारी ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडली असून सगळेच धागेदोरे आता उघडकीला येवू लागले आहेत.


वडील दारू पिउन घरातील लोकांना शिवीगाळ, मारहाण करीत असल्याच्या करणातून घरातील लोकांनी हे धक्कादायक कृत्य केले आहे. वडिलाच खून करून पुरावा लपविण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील पोलिसांनी अवघ्या बारा तासांत या प्रकरणाचा छडा लावला आहे.  शिंगणापूर - नातेपुते रस्त्यावर भवानी घात, पिंपरी येथे एका अनोळखी व्यक्तीचा  मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाच्या डोक्यावर, तोंडावर जबर मारहाणीच्या खुणा होत्या. त्यांची दुचाकी देखील रस्त्याच्या खाली पडली असल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखले आणि तातडीने हालचाली सुरु केल्या. मृतदेहाच्या अवस्थेवरून हा खून असल्याचे दिसत होते त्यामुळे पोलिसांनी  लगेच पुढील तपास सुरु केला.


सदरचा मृतदेह हा कुणाचा आहे ? याची उकल आधी होणे महत्वाचे होते. पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, हा मृतदेह माळशिरस तालुक्यातील कोंडबावी गावातील एका व्यक्तीचा असल्याचा सुगावा लागला. सुरज सावंत याने ओळख पटवत, हा मृतदेह आपल्या वडिलांचाच असल्याचे सांगितले. या सुरज पांडुरंग सावंत यानेच पोलिसात तक्रार देत अज्ञात व्यक्तीने आपल्या वडिलाचा खून केला असल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या घटनेचा अधिक तपास सुरु केला. पोलिसांनी जेंव्हा त्यांच्या कोंडाबावी गावात जाऊन चौकशी करण्यास सुरुवात केली तेंव्हा त्यांना अधिकची माहिती मिळत गेली. मयत व्यक्ती याला दारूचे व्यसन होते आणि तो पूर्णपणे व्यसनाच्या अधीन गेला होता. दारू पिऊन तो घरातील लोकांना शिवीगाळ, मारहाण करीत होता. यामुळे सुरज सावंत यानेच त्यांचा खून केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


पित्याच्या खुनाची पोलिसात तक्रार देणाऱ्या सुरज सावंत यालाच पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशी सुरु केली. या चौकशीत सुरज बोलताना फसू लागला. तो देत असलेल्या उत्तरांत पोलिसांना मोठी विसंगती दिसून येत होती. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला गेला. पण पोलिसांनी सत्य शोधून काढलेच. दारू पिऊन वडील सतत घरातील लोकांना त्रास देत होते म्हणून त्यांना घरातील एका खोलीत कोंडण्यात आले आणि लोखंडी गजाने त्यांच्या डोक्यावर , तोंडावर मारून त्यांचा खून करण्यात आला. (The murder of the father by the son,) मृत्यू झाल्यानंतर मृतदेह एका मोठ्या पिशवीत घालण्यात आला. 


पिकअप वाहनात मृतदेह ठेवला आणि नातेपुते येथील भवानी घाटात नेवून काटेरी झुडुपात फेकून देण्यात आला. यावेळी सुरज याच्या बहिणीने मयताची मोटार सायकल चालवत घाटात आणली आणि रस्त्याच्या खाली टाकून दिली. याबाबत संशयित आरोपीने कबुली दिली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने या खुनाचा छडा केवळ बारा तासांच्या आत लावला असल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. पोटाच्या मुलानेच जन्मदात्याचा असा खून केल्याने अनेकांना धक्का बसला असून, परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरु झाली आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !