BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ नोव्हें, २०२३

मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात चौघांनी घेतले विष !



शोध न्यूज  :  मराठा आरक्षण आंदोलनाची धग गावोगाव पोहोचली असून, सोलापूर जिल्ह्यातील चौघांनी विष प्राशन करून आयुष्याचा शेवट करण्याचा प्रयत्न केल्याची  एक मोठी घटना समोर आली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र अस्वस्थ झाला असला तरी,  राज्यातील सरकार चालढकल करीत आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अवघा महाराष्ट्र मराठा आरक्षणाची मागणी करीत आहे. गावागावात राजकीय पुढारी मंडळीना प्रवेश बंदी करण्यात आली आहेच पण जाळपोळीच्या घटना देखील घडत असून महाराष्ट्र सद्या अत्यंत वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. राज्यातील परिस्थिती बिघडली असतानाही राज्यात शासनाचे आस्तित्व देखील दिसून येत नाही त्यामुळे समाजात नाराजी आणि शासनाबाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. शासन आणि नेतेमंडळी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले जात असताना, अनेक मराठा तरुणांच्या देखील अंत्ययात्रा निघाल्या आहेत.  राज्यात अनेक मराठा तरुणांनी निराश होऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनांनी मराठा समाज प्रचंड अस्वस्थ झाला आहे. राज्यातील सरक्र्च्या विरोधात प्रचंड राग उफाळून येताना दिसत असताना, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीत.

नुकतेच पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील एका तरुणाने गळफास लावून केलेली आत्महत्या , मराठा समाजाच्या मनाला चटका लावून गेली आहे. माळी समाजातील एका तरुणाने, मराठा आरक्षणासाठी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे  तोच, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे चौघांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे चिंता अधिकच वाढू लागली आहे. आंदोलनाची ही धग सोलापूर जिल्ह्यातील गावोगाव पोहोचली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी  तालुक्यातील देवगाव येथे, मराठा आरक्षण मागणीसाठी चौघांनी विष प्रश्न करून आपले आयुष्य संपविण्याचा धक्कादायक प्रयत्न केला आहे. रणजित ऋषिनाथ मांजरे (वय २९), प्रशांत मोहन मांजरे (वय २८), योगेश भारत मांजरे (वय ४०) आणि दीपक सुरेश पाटील (वय २६) अशी या चार तरुणांची नावे आहेत.  मराठा आरक्षण आंदोलनात ते सक्रीय असतानाच त्यांनी हे टोकाचे पाउल उचलले आहे. 

रणजीत मांजरे या तरुणाने तणनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रणजीत याला पहाण्यासाठी योगेश मांजरे, प्रशांत मांजरे, दीपक पाटील हे तरुण रुग्णालयात आले होते. त्यांनीही रुग्णालयाच्या परिसरातच विषारी औषध प्राशन केले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (Four youths poisoned for Maratha reservation) यामुळे रुगणालय परिसरात एकच गोंधळ उडाला. तातडीने या तिघानाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  

एकाच गावातील चार तरुणांनी एकाच मागणीसाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ तर उडाली आहेच पण मराठा समाजात मोठी चिंताही व्यक्त होऊ लागली आहे. आत्महत्या हे काही आरक्षण मिळण्याचा पर्याय नाही, शिवाय मराठा तरुणच आपले आयुष्य संपवू लागले तर आरक्षण कुणासाठी घ्यायचे आहे ? असा उद्विग्न सवाल मराठा समाज विचारू लागला आहे. तरुणांनी टोकाचे पाउल न उचलता खंबीरपणे लढा द्यावा असे आवाहन देखील करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !