BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ ऑक्टो, २०२२

दिलासादायक ! यंदाचा मान्सून घेणार आता निरोप !

 


शोध न्यूज : निरोप घेता घेता थैमान घातलेल्या पावसाच्या निरोपाची वेळ आता येऊन ठेपली असून आगामी ३६ तासात पाऊस देशाचा निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 


यावर्षी राज्यात लवकर पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता परंतु काहीसे उशिराने पावसाचे आगमन झाले. राज्याच्या जवळपास सर्वच भागात यावर्षी पाऊस मुक्तपणे कोसळला आहे. राज्याच्या काही भागात पावसाची गरज होती आणि तेथेही परतीच्या मार्गावर  निघालेल्या पावसाने हजेरी लावलेली आहे. मान्सून निरोप घेण्याची वेळ आली असतानाच राज्याच्या विविध भागात त्याने जोरदार धिंगाणा घातला आणि अखेरच्या टप्प्यात शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान करून गेला. पावसाळा संपत आला आहे असे वाटत असतानाच त्याने असा काही तडाखा दिला की ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सुरु झाली आहे. धरणे, नद्या,  नाले तुडुंब भरलेले असून शेतात पिकांऐवजी पाणीच अधिक दिसू लागले आहे. 


राज्यात थैमान घातलेला पाऊस अखेरच्या टप्प्यात नकोसा होऊन गेला होता पण रोजच बरसायचा निश्चय करूनच तो हजेरी लावू लागला त्यामुळे त्रासदायक होऊ लागला. सततच्या या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून आणखी किती धिंगाणा घालणार ? असा सवाल उपस्थित होत असतानाच यावर्षीच्या मान्सूनपासून आता सुटका मिळणार असल्याची बातमी मिळाली आहे. विदर्भाच्या अनेक भागातून मान्सून परतला असून देशातूनच यंदाचा मान्सून पुढील ३६ तासात निघून जाणार आहे अशी माहिती पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. त्यामुळे आता नुकसान करणाऱ्या पावसापासून मुक्तता मिळणार आहे.   


ऐन दिवाळीत चक्री वादळाचे सावट असून २४ ऑक्टोबर रोजी हे चक्रीवादळ समुद्राच्या काठावर तयार होण्याची शक्यता असून २५ ऑक्टोबर रोजी हे वादळ आंध्र आणि ओरिसाच्या किनाऱ्यावरून प. बंगाल, बांगला देशाकडे सरकरणार आहे. महाराष्ट्राला मात्र या चक्रीवादळाचा धोका  नसून महाराष्ट्रावर कसलाही परिणाम जाणवणार  नसल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.  निरोप घेता घेता हा पाऊस आज आणि उदय मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्याच्या काही भागात आणि कोकणात दणका देणार आहे. या भागात गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून कोल्हापूर, पुणे, सातारा या भागात ढगाळ हवामान राहणार असून ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. 


दक्षिण बंगाल उपसागर आणि अंदमान समुद्रात सद्या कमी दाबाचे क्षेत्र असून ते येत्या तीन चार दिवसात तीव्र होणार आहे. (Good news for farmers, Monsoon will return) या दरम्यान किनारपट्टीकडे त्याचा प्रवास होणार आहे. येत्या सोमवारच्या दरम्यान त्याचे चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते. चक्री वादळाची शक्यता व्यक्त करण्यात आली असली तरी राज्यासाठी हवामान विभागाने या वादळाबाबत काहीही इशारा हवामान खात्याने दिलेला नाही. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता नाही.    





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !